Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बोटापेक्षाही बारीक असू शकतो Vivo V29e 5G; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

7

Vivo V29e स्मार्टफोन येत्या २८ ऑगस्टला भारतीयांच्या भेटीला येईल. परंतु त्याआधीच ह्या हँडसेटचे स्पेसिफिकेशन्स एकेक करून लीक होत आहेत. आता तर मोबाइलचा ट्रेनिंग मटेरियल लीक झालं आहे. त्यामुळे फोनची संपूर्ण माहिती समोर आली आहे. फीचर्स पाहून वाटत आहे की हा मिड बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Vivo V29e 5G ची डिजाइन

लीकनुसार Vivo V29e फोनमंदाचे ३डी कर्व डिजाइनचा वापर केला जाईल. हा फोन फक्त ७.५७ मिमी अल्ट्रा स्लिम आणि वजन १८०.५ ग्राम असेल. विशेष म्हणजे एवढी कमी जाडी असून देखील ह्या फोनमध्ये कर्व डिस्प्ले कमीच पाहायला मिळतो त्यामुळे हा आता पर्यंतचा स्लिमेस्ट ३डी कर्व डिस्प्ले असलेला फोन बनू शकतो.

वाचा: तुम्हीही फोन कव्हरमध्ये नोट ठेवता? जीवघेणी ठरू शकते ही छोटीशी सवय, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Vivo V29e चे लीक स्पेसिफिकेशन्स

Vivo V29e डिवाइसमध्ये ६.७८ इंचाचा मोठा कर्व अ‍ॅलोमेड डिस्प्ले मिळेल, जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २४०२ x१०८० एफएचडी प्लस रिजॉल्यूशन मिळेल. तसेच यात १३०० निट्झ पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळेल. पावर बॅकअपसाठी ह्यात ५०००एमएएचची बॅटरी मिळेल जी ४४वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन अँड्रॉइड १३ वर चालेल.

Vivo V29e 5G डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ ऑक्टा कोर प्रोसेसर मिळेल. हा प्रोसेसर ६ एनएम प्रोसेसवर चालतो. ज्याचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड २.२गिगाहर्ट्झ आहे. जोडीला ८जीबी रॅमसह रॅम ३.० चा सपोर्ट मिळेल. त्यामुळे अतिरिक्त ८जीबी रॅम वाढवता येईल. फोनमध्ये २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाईल.

वाचा: थांबा! सगळी कामं थांबवून आताच्या आता अपडेट करा Google Chrome, नाहीतर…

डिवाइस ५० मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा लेन्ससह येईल. डिवाइसमध्ये बॅक पॅनलवर ६४ मेगापिक्सलचा ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन असलेला प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळेल. ह्या कॅमेऱ्यासह वेडिंग स्टाइल पोट्रेट फोटोग्राफीची सुविधा मिळेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.