Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वनप्लसचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय; OnePlus 12 चे स्पेसिफिकेशन्स लीक

7

वनप्लस आपल्या नंबर सीरीजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करते जे आयफोन सारख्या मोबाइल्सना टक्कर देतात. आता ह्या सीरिजमध्ये नवीन मोबाइल OnePlus 12 जोडला जाणार आहे. डिवाइस बद्दल गेल्या काही दिवसांपासून माहिती समोर आली आहे. आता स्मार्टफोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. असं सांगितलं जात आहे की हा फोन पूर्वीपेक्षा जास्त दमदार अपग्रेडसह सादर केला जाईल. चला जाणून घेऊया लीकमध्ये समोर आलेल्या माहिती.

OnePlus 12 चे लीक स्पेसिफिकेशन्स

मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी वनप्लस १२ स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये लाँच होणाऱ्या स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटसह बाजारात येऊ शकतो. जो क्वॉलकॉमचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असेल. त्याचबरोबर कंपनी २४जीबी पर्यंत रॅमचा सपोर्ट देऊ शकते. तसेच ह्यावेळी कॅमेरा देखील मोठ्याप्रमाणात अपग्रेड केला जाईल.

वाचा: १६ हजार रुपयांपर्यंतची बचत! Galaxy Z Flip 5 आणि Z Fold 5 वर कंपनीनं आणली नवी ऑफर

लीकनुसार वनप्लस १२ मध्ये २के रिजॉल्यूशन असलेला डिस्प्ले, कर्व एज आणि हाय-फ्रिक्वेन्सी डिमिंगचा सपोर्ट मिळू शकतो. नवीन फोन मेटालिक मिड-फ्रेमसह बाजारात येण्याची शक्यता आहे. तसेच ह्यात ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. टेंप्रेचर कंट्रोलसाठी मोठा व्हेपर चेंबर दिला जाऊ शकतो.

कंपनी डिवाइसमध्ये पावरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटचा वापर करू शकते. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रेनो जीपीयू मिळू शकतो. फोनमध्ये १६जीबी आणि २४जीबी पर्यंत रॅमचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. ह्यात १टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. ज्याचा अर्थ असा की ८जीबी किंवा १२जीबी रॅम ऑप्शन आता ह्या फोनमध्ये मिळणार नाहीत आणि कंपनी मोठ्या मॉडेलवरच काम करेल.

वाचा:आयफोनच्या तोडीचा स्मार्टफोन! Vivo X100 सीरीजच्या लाँचची कंपनीनेच दिली माहिती; असे असू शकतात फिचर

वनप्लस १२ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50MP Sony IMX9 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 50MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा सेन्सर आणि 64MP 3x पेरिस्कोप कॅमेरा लेन्सचा समावेश असू शकतो. वनप्लस १२ मध्ये १०० वॉट फास्ट चार्जिंग आणि ५०वॉट वायरलेस चार्जिंगसह ५,४००एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.