Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण
- माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात घेतला अखेरचा श्वास
- आता बाबा पुन्हा कधीच येणार नाही, दोन लेकरं पोरकी
सुधाकर शिंदे देशाची सेवा करताना शहीद झाल्याचे कळताच बामणी गावावर शोककळा पसरली आहे. शिंदे यांचं शालेय शिक्षण मुक्रामाबाद येथील डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालयात घेतले. त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठातून सन २००० मध्ये कृषी विषयाची पदवी घेतली. २००१ मध्ये आयटीबीटी विभागात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले २०१९ मध्ये छत्तीसगड राज्यात नक्षली प्रतिबंधक पथकात नियुक्ती झाली.
कार्यकिर्दीत शिंदे यांनी हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरयाणा, पंजाब सिमेवर सेवा बजावली आहे. शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. शहीद सुधाकर शिंदे यांच्या पार्थिवावर आज मुळगावी बामणी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Jawan of Nanded martyred in a cowardly attack by maoist in chhattisgarh)