Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
itel Smartwatch 2 Ultra चे फीचर्स
वर सांगितल्याप्रमाणे यात २ इंचाचा IPS डिस्प्ले आहे. यात इनबिल्ट मायक्रोफोन आणि स्पीकर आहे. तसेच ब्लूटूथ 5.3 देण्यात आले आहे. बॅटरी लाइफबद्दल बोलायचे झाल्यास, यात 600 mAh बॅटरी आहे जी एका चार्जवर १२ दिवस टिकू शकते. तसंच स्टँडबाय वेळ ३० दिवस आहे. यामध्ये हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंग क्षमता देण्यात आली आहे. तसेच, हार्ट रेट, SpO2, स्लीप पॅटर्न आणि १०० हून अधिक स्पोर्ट्स मोडही सपोर्टेड आहे.
तसंच हे स्मार्टवॉच १०० हून अधिक वॉच फेसेससह येते. यामध्ये कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोलर देण्यात आले आहेत. यासोबतच मेसेज नोटिफिकेशन अॅक्सेस आणि फोन फाइंड देखील देण्यात आला आहे. हे पाणी प्रतिरोधकतेसाठी IP68 रेटिंगसह येते. यासोबत १ वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. स्मार्टवॉच 2 अल्ट्रा सर्व आयटेल किरकोळ विक्रेते आणि ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते.
वाचा: परवडणाऱ्या किंमतीत आले रियलमीचे दोन भन्नाट स्मार्टफोन; १६जीबी रॅम, १०८एमपीचा कॅमेरा आणि बरंच काही…