Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आणखी एक स्वस्त 5G Phone घेऊन येतेय Samsung; Galaxy A25 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आले समोर

10

सॅमसंग काही दिवसांनी आपल्या ए-सीरीजचा विस्तार करू शकते. ज्यात Samsung Galaxy A25 स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो. गेल्या काही महिन्यांपासून हा फोन टेक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. डिवाइसचे स्पेसिफिकेशन आणि रेंडर्स देखील समोर आले आहेत. आता गॅलेक्सी क्लबनं ह्या फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया लीक झालेली संपूर्ण माहिती.

सॅमसंग गॅलेक्सी ए२५ चा कॅमेरा

रिपोर्टनुसार सॅमसंगच्या नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy A25 मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल असं सांगण्यात आलं आहे. त्यातील फक्त मुख्य कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे अन्य दोन सेन्सरची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. तर फ्रंटला डिवाइसमध्ये १३ मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाईल. तसेच अंदाज वर्तवण्यात आला आहे की Samsung Galaxy A25 मध्ये ५जी टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

वाचा: दमदार डिस्प्ले, चांगली बॅटरी लाईफ, ब्लूटूथ कॉलिंगसह Boat Wave Neo Plus भारतात १,५९९ रुपयांना लाँच

Samsung Galaxy A25 चे लीक स्पेसिफिकेशन्स

मीडिया रिपोर्टनुसार Samsung Galaxy A25 मध्ये ६.४४ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशनला सपोर्ट करेल. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर आणि माली जीपीयू मिळण्याची शक्यता आहे. तर ८जीबी रॅम आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेज असलेला बेस मॉडेल बाजारात येऊ शकतो. इतर व्हेरिएंट येण्याची शक्यता देखील आहे.

वाचा: आता ऑनलाइन मिळणार ९९९ रुपयांच्या 4G Phone; Jio Bharat 4G अ‍ॅमेझॉनवर लिस्ट

मोबाइलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. डिवाइसमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि २५वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. अन्य फीचर्स पाहता Samsung Galaxy A25 मध्ये ड्युअल सिम ५जी, ४जी, ब्लूटूथ, वाय-फाय, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स मिळू शकतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.