Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘डीआरडीओ’ मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती! आजच करा अर्ज..

6

सरकारी नोकरीची वाट पाहत असाल आणि अप्रेंटीस पदासासाठी नोकरीचा शोध घेत असाल तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘डीआरडीओ’ म्हणजेच ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ यांनी अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ५४ पदे भरली जाणार असून संस्थेने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

हे अर्ज ‘डीआरडीओ’च्या drdo.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मात्र ऑनलाईन पद्धतीने ते सबमिट करता येणार नाहीत. संबंधित अर्ज टाईप करून भरायचा आहे. तसेच त्याची एक प्रत, अर्जात नमूद केलेली सर्व कागदपत्रे. शैक्षणिक गुणपत्रिका, ओळखपत्र आणि आवश्यक ते सर्व दस्तऐवज ६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत खालील पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता:
Director, Integrated Test Range (ITR), Chandipur, Balsore, Odisha, Pin Code -756025

(वाचा: Job Tips For Promotion: नोकरी करताय पण प्रमोशन मिळत नाहीय? मग ‘या’ पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा..)

पदे आणि रिक्त जागा…

पदवीधर प्रशिक्षणार्थी(Graduate Trainee) : ३० पदे
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Apprentice Technician): २४ पदे

या भरती बाबतची अधिकृत अधिसुचना https://drdo.gov.in/sites/default/files/career-vacancy-documents/Full_AdvertisementITR2108223.pdf या लिंक वर उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता :

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यतापात्र विद्यापीठातून किंवा उच्च शिक्षण संस्थेतून पदवीधर असणे गरजेचे आह. त्या त्या पदानुसार आवश्यक ती पदवी त्याच्याकडे हवी. (B.E/ B.Tech/ Diploma/ BBA/ B.Com) इच्छुक उमेदवार हे २०१९, २०२०, २०२१, २०२३ आणि २०२३ या वर्षांमध्येच पदवी उत्तीर्ण झालेले असावे. २०१९ पूर्वी पदवी प्राप्त केलेले उमेदवार पात्र धरले जाणार नाहीत. पदव्यूत्तर पदवी मिळालेले उमेदवार या निवड प्रक्रियेस पात्र नसतील.

निवड प्रक्रिया अशी असेल..

या भरती प्रक्रियेतून कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांचीच पुढील परीक्षेसाठी निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना लेखी चाचणी आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास वैयक्तिक मुलाखत द्यावी लागेल. या दोन्हींच्या निकषावर अंतिम निवड केली जाईल.

(वाचा: Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.