Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Infinix Zero 30 5G फोन लाँचपूर्वीच करु शकता प्री-बुक, या तारखेला सुरु होणार प्री बुकिंग

9

नवी दिल्ली : Infinix Zero 30 5G हा स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. Infinix ने भारतात या फोनच्या प्री-ऑर्डरच्या तारखेबद्दल नुकतीच माहिती दिली असून ही तारीख २ सप्टेंबर असणार असल्याचं जाहिर केलं आहे. कंपनीने याआधी हँडसेटच्या डिझाइनबद्दल सांगितले होते. फ्लिपकार्टवर यासाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे, ज्याने फोनबद्दलचे काही तपशील उघड केले आहेत. चलातर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

Infinix Zero 30 5G चे फीचर्स
फ्लिपकार्टवरुन समोर आलेल्या माहितीनुसार Infinix Zero 30 5G २ सप्टेंबरपासून भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला जाईल. यामध्ये 60fps वर व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते. त्याचबरोबर 4K रेझोल्युशनची सुविधाही उपलब्ध होणार आहे. Infinix Zero 30 5G दोन्ही बाजूंना कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह ऑफर केले जाईल. फोनमध्ये ६.७८ इंचाचा गोलाकार १० बिट AMOLED पॅनल दिला जाईल. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz असेल. त्याचा टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे आणि पीक ब्राइटनेस 950 nits आहे.

हा फोन Infinix Zero 20 5G चा अपग्रेडेड व्हेरियंट असेल. विशेष म्हणजे ७.९ मिमी जाडी असेलेला हा फोन या सेगमेंटमधील सर्वात पातळ फोन असल्याचा दाव कंपनीने केला आहे. एका लीकनुसार, Infinix Zero 30 5G मध्ये MediaTek Dimensity 8020 प्रोसेसर असू शकतो. यामध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज दिले जाऊ शकते.

किंमतीचं काय?

एका टिपस्टरने दिलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा असेल. यामध्ये पहिला सेन्सर 108 मेगापिक्सलचा असेल. दुसऱ्यामध्ये अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह 13-मेगापिक्सलचा सेन्सर आणि तिसरा 2-मेगापिक्सलचा सेन्सर असेल. Infinix Zero 30 5G ला 68W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनची किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

वाचा : iPhone 15 Pro ‘या’ दोन नव्या रंगात होऊ शकतो लाँच, फास्ट चार्जिंगचाही असणार सपोर्ट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.