Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ganesh Chaturthi 2023 Date: तुमच्या गणपतीच्या मुर्तीचं बुकींग झालं का? या तारखेला येणार बाप्पा घरोघरी
श्री कृष्ण जयंती मुहूर्त वेळ
बुधवार ६ सप्टेंबर रोजी श्रावण शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी सुरू होईल आणि ७ सप्टेंबर रोजी ४ वाजून १५ मिनिटापर्यंत चालेल. यासह ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी रोहिणी नक्षत्र सुरू होईल. रोहिणी नक्षत्राची समाप्ती ७ तारखेला सकाळी १०.२५ वाजता होईल. सोमवार किंवा बुधवार हा भाद्रपद अष्टमीचा दिवस आहे असा शास्त्रात नियम आहे, त्यामुळे त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत ठेवणे गृहस्थांसाठी विशेष फायदेशीर आहे. यावेळी रोहिणी नक्षत्रही अष्टमी तिथीला येईल असा विशेष योगायोग घडला आहे. अशा स्थितीत ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी आणि ७ सप्टेंबर रोजी गोपाळकाला साजरा केला जाईल, हे गृहस्थ आणि सर्वसामान्यांसाठी विशेष फलदायी ठरेल. तर शास्त्रीय नियमानुसार ७ सप्टेंबरला सातव्या दिवशी जन्माष्टमी व्रत करणे वैष्णव संतांसाठी शुभ राहील.
Diwali 2023: दिवाळी कधी आहे? जाणून घेऊया तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
जन्माष्टमी कशी साजरी करतात
जन्माष्टमीच्या दिवशी, लोक खऱ्या भक्तीने उपवास करून भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतात. उपवास अष्टमीला सुरू होतो आणि नवमीला संपतो. व्रत पाळणाऱ्यांनी सप्तमी तिथीपासून ब्रह्मचर्य पाळायला सुरुवात करावी आणि सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे. जन्माष्टमीच्या दिवशी काही घरांमध्ये श्रीकृष्णाचे बालरूपाची विधीवत पूजा होते. तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो. महाराष्ट्रात गोपाळकाला म्हणजे दहीहंडी करण्याची परंपरा आहे.
जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून हातात गंगाजल घेऊन व्रत करण्याचा संकल्प करावा. काही घरांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी सुंदर तबकडी सजवली जातात आणि स्तनपान करणाऱ्या देवकीची किंवा बाळगोपाळाच्या मूर्तीची पूजा केली जाते. जर तुम्हाला देवकीची मूर्ती सापडत नसेल तर तुम्ही गाय आणि तिच्या वासराचीही पूजा करू शकता. रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांना अन्नदान करण्यासाठी फळे, मेवा, पिठाची पंजिरी आणि पंचामृत देखील केले जाते. रात्री देवाचा भोग अर्पण केल्यावर तुम्ही स्वतःही फळ खाऊ शकता.