Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Realme C51 भारतात लवकरच होणार लाँच, फीचर्ससह किंमतही लीक

14

नवी दिल्ली : Realme C51: बजेट स्मार्टफोन तयार करण्यात आघाडीवर असणारी Realme कंपनीने तैवान आणि इंडोनेशियामध्ये एक बजेट स्मार्टफोन लाँच केला होता, हा फोन म्हणजे Realme C51. आता कंपनीने हा फोन भारतातही लाँच करणार असल्याचं समोर आलं आहे. कंपनीने स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवरून याची पुष्टी केली आहे. रिअलमीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर फोनचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘चॅम्पियन इज कमिंग’ असं लिहिलं आहे. सध्या, स्मार्टफोनची लाँच तारीख आणि स्पेसिफिकेशन्स समोर आलेले नाहीत. हा फोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाला असला तरी चलातर याचे स्पेक्स पाहू…

Realme C51 चे फीचर्स
Apple च्या iPhone 14 Pro सारखी रचना या फोनमध्ये उपलब्ध आहे. हे एक पॉली कार्बोनेट बिल्ड आहे ज्याच्या मागील बाजूस ड्युअल टेक्सचर आहे. स्मार्टफोनमध्ये HD + रिझोल्यूशनसह मोठा ६.७ इंचाचा वॉटर-ड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 0.3MP डेप्थ सेन्सर आहे. समोर 5MP कॅमेरा उपलब्ध आहे. Unisoc Tiger T612 octa-core SoC, 33W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी या फोनमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 4/64GB आणि 4/128GB व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे.

वाचा: SIM Card खरेदीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक; उल्लंघन केल्यास १० लाखांचा दंडकिंमतीचं काय?
तैवानच्या बाजारात हा स्मार्टफोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक या दोन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. येथे फोनची किंमत सुमारे १०,४०० रुपये आहे. त्याच किंमतीच्या ब्रॅकेटमध्ये हा भारतात देखील लाँच केला जाऊ शकतो. काही काळापूर्वी Realme ने Realme C55 स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. त्याची किंमत १०,९९९ रुपये आहे.

वाचा : iPhone 15 Pro ‘या’ दोन नव्या रंगात होऊ शकतो लाँच, फास्ट चार्जिंगचाही असणार सपोर्ट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.