Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ताप आलाय की नाही ते सांगणार छोटीशी अंगठी; Boat Smart Ring घेणार स्मार्टवॉच जागा

14

Boat नं वियरेबेल डिव्हाइसेसच्या नव्या कॅटेगरीमध्ये प्रवेश केला आहे, कंपनीनं आपली पहिली स्मार्ट रिंग लाँच केली आहे. भारतात सादर करण्यात आलेल्या ह्या अंगठीचं नाव Boat Smart Ring ठेवण्यात आलं आहे. सिरॅमिक डिजाईनसह आलेली ही रिंग तुमच्या दैनंदिन अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकते.

किंमत

बोट स्मार्ट रिंगची किंमत ८९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्मार्ट रिंग अ‍ॅमेझॉनसह फ्लिपकार्टवरून २८ ऑगस्टपासून विकली जाईल. ही रिंग तीन आकारात उपलब्ध होतील ज्यात ७, ९ आणि ११ चा समावेश आहे ज्यांचे डायामीटर अनुक्रमे १७.४०मिमी, १९.१५मिमी आणि २०.८५मिमी असतील.

वाचा: लाँचपूर्वीच पाहा तुमच्या बजेटमध्ये बसतोय का Vivo V29e; भारतीय किंमत आली समोर

बोट स्मार्ट रिंगचे फिचर

बोट स्मार्ट रिंगमध्ये आवश्यक असे फिचर आहेत. त्याचबरोबर अ‍ॅडव्हान्स ट्रॅकिंग क्षमता आहे तसेच प्रीमियम सिरॅमिक आणि मेटल डिजाईन देण्यात आली आहे. ह्यात स्मार्ट टच कंट्रोल्स आहेत, ज्यात स्वाइप नेव्हिगेशन फॅक्शनॅलिटीचा समावेश आहे.

ह्या रिंगच्या मदतीनं युजर्स म्युजिक प्ले आणि पॉज करू शकतात, ट्रॅक बदलू शकतात, फोटो क्लिक करू शकतात आणि अ‍ॅप्लिकेशनमध्ये नेव्हीगेटही करू शकतात. बोट स्मार्ट रिंग बोट रिंग अ‍ॅपसोबत काम करते. अ‍ॅपमध्ये युजरच्या आरोग्याची सविस्तर माहिती दिली जाईल.

बोट रिंगमध्ये हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर आणि बॉडी टेम्परेचर मॉनिटर मिळतो. तसेच ही रिंग तुमची झोप ट्रॅक करू शकते आणि मेनस्ट्रल ट्रॅकिंगची सुविधाही मिळते. बोटच्या हहा स्मार्ट रिंगमध्ये अ‍ॅक्सिस मोशन सेन्सर्स असतील आणि वॉटर रेजिस्टंट डिजाईन मिळेल.

वाचा: आयफोनमधील जबराट फिचर मिळणार बजेट फ्रेंडली फोनमध्ये; Realme C51 लवकरच येतोय भारतात

नॉइजच्या लुना रिंग कडून मिळणार टक्कर

बोट स्मार्ट रिंगला आगामी नॉइज लुना रिंगकडून टक्कर मिळेल. नॉइजच्या आगामी स्मार्ट रिंगमध्ये झोप, तत्परता आणि अ‍ॅक्टिव्हिटीची सविस्तर माहिती दिली जाईल. अ‍ॅडव्हान्स सेन्सर आणि मजबूत बिल्ड दिली जाईल आणि ह्या रिंगच्या मदतीनं युजरचं आरोग्य सुधारण्याचं ध्येय कंपनीनं डोळ्यासमोर ठेवलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.