Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

देशातील पहिल्यावहिल्या ‘एआय स्कूल’ची स्थापना; नुकताच पार पडला उद्घाटन सोहळा

11

First AI School Of India In Kerala: Artificial Intelligence (AI) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे जगाचे रूप बदलणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल होऊन, दिवसागणिक विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा मोलाचा वाट आहे. जेव्हापासून कृत्रिम बुद्धीमत्तेची संकल्पना सत्यात उतरली, तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण भाग बनायला सुरुवात केली आहे.

आता, भारतात पहिली वहिली कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञाचे धडे देणार्‍या पहिल्यावहिल्या शाळेची स्थापना आणि सुरुवात झाली आहे. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली आय शाळा ‘शांतीगिरी विद्याभवन’ उघडण्यात आली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३ ला या एआय स्कूलचे उद्घाटन केले.

भारतातील पहिली AI School इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही शाळा I-Learning Engine (ILE) USA आणि Vedic E-School यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. एआय टूल्सच्या मदतीने, शैक्षणिक अभ्यासक्रमाची मांडणी आणि रचना, विद्यार्थांचे मूल्यांकन आणि शाळेतील पैलूंमध्ये या तंत्राचा वापर केला जाणार आहे.

(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

शांतीगिरी विद्याभवन एआय स्कूल मधील अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या शाळेत पारंपारिक अध्यापन पद्धती व्यतिरिक्त, मुलांना एआयच्या मदतीने प्रगत साधने पुरवली जातील. विद्यार्थ्यांना शिकण्याची ही नवीन पद्धत खरोखर चांगले शिक्षण देणार असून, भविष्यातील अनेक आव्हानांसाठी ही नवी पिढी तयार असणार आहे.

ही आहे शाळेची वैशिट्ये :

  • ही AI शाळा ८वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे.
  • या शाळेत मुलांना अनेक शिक्षक, विविध स्तरांची चाचणी, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मरण तंत्र याविषयी माहिती दिली जाणार आहे.
  • पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावरही भर दिला जाणर असून, मुलाखत कौशल्ये, ग्रूप डिस्कशन, गणित, लेखन कौशल्ये, इंग्रजी आणि इमोशनल वेल बिंग याबद्दलही माहिती दिली जाणार आहे.
  • शालेय परीक्षांव्यतिरिक्त, मुलांना JEE, NEET, CUET, CLAT, GMAT आणि IELTS सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील तयार केले जाणार आहे.
  • या AI शाळेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यास मदत करते.
  • शिवाय, परदेशी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्यासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे, ज्यामुळे हे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतील.

(वाचा : AI Free Training: केंद्र सरकारच्यावतीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील ट्रेनिंग; आजच करा Free रजिस्ट्रेशन)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.