Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
किंमत
Ambrane स्मार्ट वॉचची किंमत १,९९९ रुपयांपासून सुरु होते. हे वॉच मेटालिक ब्लॅक, ब्लॅक, ग्रीन, अल्पाइन ग्रीन मॅग्नेटिक आणि ब्राउन कलर ऑप्शनमध्ये येतात. वॉच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या ऑफिशियल वेबसाइटवरून विकत घेता येईल.
वाचा: ४जी फोनला पण मिळणार 5G Speed; रिलायन्सनं लाँच केला Jio Air Fiber
स्पेसिफिकेशन्स
Ambrane Marble स्मार्टवॉचमध्ये एक रोटेटरी नॉब देण्यात आला आहे. वॉचमध्ये १.४३ इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले मिळतो, ज्याची पीक ब्राइटनेस लेव्हल १००० निट्झ आहे. विशेष म्हणजे ही स्क्रीन ६०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. कंपनीनं २.५डी कर्व ग्लासचा वापर करून हे वॉच सादर केलं आहे.
वॉच हर्ट रेट ट्रॅकिंग, SpO2 मॉनिटर, मेनूस्ट्रल सायकल ट्रॅकिंग, स्लिप मॉनिटरिंग सारख्या हेल्थ फीचर्ससह येतं. वॉचमध्ये १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच वॉचमध्ये अनेक वॉच फेस मिळतात, ज्यांच्या मदतीनं कस्टमायजेशन करता येतं.
वाचा: Mukesh Ambani यांची मोठी घोषणा; Jio जगाला दाखवणार 6G ची ताकद, जाणून घ्या कधी होणार लाँच
ब्लूटूथ कॉलिंगचंही फिचर
वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर देण्यात आलं आहे. त्याचबरोबर इनबिल्ट मायक्रोफोन, स्पिकर आणि डायलरची सुविधा मिळते. वॉच ७ दिवसांच्या बॅटरी लाइफसह येतो. वॉच IP68 सर्टिफिकेशनसह येतो त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहू शकतं. त्याचबरोबर वॉच ऑलवेज-ऑन डिस्प्ले, एक इनबिल्ट गेम देखील मिळतात. तर व्हॉइस असिस्टंटच्या सपोर्टमुळे बोलून वॉच कंट्रोल करता येतं.