Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- रावसाहेब दानवेंची भाषा कुसंस्कृतपणा दर्शवणारी.
- राहुल गांधींवरील त्या टीकेला पटाले यांचे प्रत्युत्तर.
- जन आशीर्वाद यात्रेत फक्त शिव्या देण्याचे काम!
वाचा: तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल!; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा
‘जनतेला खोटी आश्वासने देऊन मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले. मागील सात वर्षांत मोदी सरकारने देश रसातळाला घालवला. अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक घसरण झाली आहे. जीडीपी घसरला आहे, पेट्रोल १०० रुपये पार करून दोनशे रुपयाकडे वाटचाल करत आहे, डिझेल ९६ रुपये लिटर झाले आणि काँग्रेसच्या राजवटीत ४४० रुपयांना मिळणारा स्वयंपाकाचा गॅस ८५० रुपये झाला. महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. जागतिक पातळीवर भारताची पत घसरली आहे. चीन सीमाभागात अतिक्रमण करत आहे त्यावर मोदी सरकार चकार शब्द काढत नाहीत. चीनचे नाव घ्यायलाही मोदींना भीती वाटते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दीडपट हमीभाव देणार अशा वल्गना केल्या परंतु शेतकऱ्यांचे अच्छे दिन येण्याऐवजी मोदी सरकारने शेती व शेतकरी उद्ध्वस्त करणारे काळे कायदे आणले. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यावर जीएसटी लावला जातो. खते, बियाणांच्या किमती भरमसाठ वाढवल्या असून शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम मोदी सरकार करत असून ‘हम दो हमारे दो’चे हे सरकार व त्यांचे मंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत. देशातील प्रश्न गंभीर असून सामान्य जनतेचे लक्ष या मुळ मुदद्यावरून दुसरीकडे वळवण्यासाठी दानवेंसारखे मंत्री शिवराळ भाषेतून टीका करत आहेत. जनता त्यांच्या या भुलथापांना आता बळी पडणार नाही’, असे पटोले म्हणाले.
वाचा: ठाकरे सरकारचा नारायण राणेंना दणका; जन आशीर्वाद यात्रेवर मोठी कारवाई
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी तसेच गांधी कुटुंबावर पातळी सोडून टीका करून रावसाहेब दानवे व भाजपाचे नेते त्यांची पातळी दाखवून देतात. त्यांच्यावर झालेले संस्कार यातून दिसतात. त्यांनी त्यांची पातळी सोडली तरी काँग्रेस नेते मात्र भाजपावर टीका करताना पातळी सोडणार नाहीत. मोदी सरकारबद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष असून जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराच पटोले यांनी दिला.
वाचा:‘ती’ ऑडिओ क्लिप: नीलेश लंके भेटल्यानंतर अण्णांनी घेतली ‘ही’ भूमिका