Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१० हजारांच्या आत मिळू शकतं आयफोनमधील फिचर; Realme C51 च्या लाँच डेटची घोषणा

11

Realme C51 ४ सप्टेंबरला भारतात लाँच होईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. गेल्याच आठवड्यात कंपनीनं हा फोन टीज करण्यास सुरुवात केली होती. आता सी सीरिजच्या ह्या फोनची लाँच डेट कंपनीनं सांगितली आहे. लो बजेट सेगमेंटमधील रियलमी सी५१ पुढील आठवड्यात भारतीय बाजारात पदार्पण करेल.

रियलमी सी५१ कधी येणार भारतात

रियलमीनं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी भारतीय बाजारात आपला नवा नवीन ‘सी’ सीरीज स्मार्टफोन घेऊन येत आहे जो रियलमी सी५१ नावानं ४ सप्टेंबरला दुपारी १२ भारतात लाँच होईल. हा एक वचुर्अल इव्हेंट असेल, ज्याचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह युट्युब चॅनेलवर देखील केलं जाईल.

वाचा: सॅमसंगपेक्षा स्वस्तात दुमडणारा मोबाइल; दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N3 Flip लाँच

अंदाजे किंमत

सी सीरिजमधील रियलमी सी५३ १०८ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह ९९९९ रुपयांमध्ये लाँच झाला आहे. त्यामुळे रियलमी सी५१ ची किंमत त्यापेक्षा कमी असेल असा अंदाज लावेल जात आहे. त्यामुळे आशा आहे की ४ सप्टेंबरला लाँच होणाऱ्या रियलमी सी५१ ची किंमत ९ हजारांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते.

रियलमी सी५१ चे स्पेसिफिकेशन्स

ग्लोबल मार्केटमध्ये रियलमी सी५१ स्मार्टफोन १६०० x ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.७ इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. हा एलसीडी पॅनल ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी ३३वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

हा फोन अँड्रॉइड १३ आधारित रियलमी युआय टी एडिशनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी यूनिसोक टी६१२ चिपसेटची ताकद मिळते. तर ग्राफिक्ससाठी माली-जी५७ जीपीयू आहे.जोडीला ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन २टीबी पर्यंतचा मेमरी कार्डला सपोर्ट करतो.

वाचा: फक्त १६ हजारांत २५६जीबी स्टोरेज असलेला फोन; Tecno नं लाँच केला हटके बॅक पॅनल असलेला मोबाइल

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच बॅक पॅनलवर एफ/१.८ अपर्चर असलेला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/२.० अपर्चर असलेल्या ८ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.