Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकदा चार्ज करा आणि १० दिवस विसरून जा! अँटी फिंगरप्रिंट कोटिंगसह Amazfit Bip 5 स्मार्टवॉच लाँच

10

Amazfit Bip 5 स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच करण्यात आलं आहे. ह्या वॉचची किंमत ७,५०० रुपयांपेक्षा कमी आहे. ह्यात १.९१ इंचाचा LCD डिस्प्ले आहे, जो अँटी-फिंगरप्रिंट कोटिंग आणि २.५डी टेम्पर्ड ग्लाससह येतो. वॉचमधील ३००एमएएचची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर १० दिवस पर्यंत चालते.

Amazfit Bip 5 ची किंमत

Amazfit Bip 5 भारतात ७,४९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. ह्याची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाईल. हे स्मार्टवॉच क्रीम व्हाइट, पेस्टल पिंक आणि सॉफ्ट ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल.

वाचा: १० हजारांच्या आत मिळू शकतं आयफोनमधील फिचर; Realme C51 च्या लाँच डेटची घोषणा

Amazfit Bip 5 चे फीचर्स

Amazfit Bip 5 मध्ये २.५डी टेम्पर्ड ग्लास डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यावर अँटी-फिंगरप्रिंट कोटिंग आहे. हा १.९१ इंचाचा एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्याचे पिक्सल रेजोल्यूशन ३२०x३८० आहे. ह्या स्मार्टवॉचमध्ये १२० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. ज्यात सायकलिंग, धावणे, चालणे आणि स्विमिंगचाही समावेश आहे.

Amazfit Bip 5 मध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियल-टाइम जीपीएस ट्रॅकिंग आणि रूट नेव्हिगेशन सर्व्हिसेज देखील मिळते. हे फोनशी कनेक्ट करून सहज कॉलिंगचा आनंद घेता येईल. त्यासाठी स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट मायक्रोफोन आणि स्पिकर आहे. तसेच म्यूजिक कंट्रोल, इव्हेंट रिमाइंडर, टू-डू लिस्ट, स्मार्ट नोटिफिकेशन आणि फाइंड माय फोन सारखे फीचर्सही मिळतात.

वाचा: इंस्टाग्रामवर कोणीतरी ब्लॉक केलंय का? असं जाणून घ्या कोणी तुम्हाला Instagram वर ब्लॉक केलंय

Amazfit Bip 5 मध्ये ३००एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. जी १० दिवसांपर्यंतचा बॅटरी लाइफ देते. बॅटरी सेव्हर मोड ऑन केल्यास ३० दिवसांपर्यंतचा बॅटरी लाइफ मिळतो. हे स्मार्टवॉच Zepp OS 2.0 वर चालतं. ह्यात Google Fit आणि Apple हेल्थचा सपोर्ट देण्यात आला आहे. ह्याच वजन ४० ग्राम आहे.

हा ब्लड ऑक्सीजन सेन्सर, हार्ट रेट ट्रॅकर आणि बायोट्रॅकर सारख्या अनेक हेल्थ ट्रॅकर सेन्सर्सचा समावेश आहे. ह्यात स्ट्रेस देखील मॉनिटर करता येतो. त्याचबरोबर ७० पेक्षा जास्त वॉच फेस उपलब्ध आहेत. ह्या वॉचमध्ये अनेक मिनी-अ‍ॅप्स देण्यात आली आहेत ज्यात ३० पेक्षा जास्त मिनी-गेमचा समावेश आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.