Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Huawei Mate 60 Pro ची किंमत आणि उपलब्धता
Huawei Mate 60 Pro च्या १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६९९९ युआन (जवळपास ७९,३९३ रुपये) आहे. तर १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज व्हेरिएंट आणि १२जीबी रॅम व १टीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत समोर आली नाही. फोन ग्रीन, सिल्व्हर, पर्पल आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. सध्यातरी Huawei Mate 60 Pro चीनपुरताच मर्यादित असेल हे स्पष्ट झालं आहे.
वाचा: सॅमसंगपेक्षा स्वस्तात दुमडणारा मोबाइल; दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N3 Flip लाँच
Huawei Mate 60 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Huawei Mate 60 Pro मध्ये ६.८२ इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी एलटीपीओ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात अडॅप्टिव रिफ्रेश रेट १-१२०हर्ट्झ आणि १४४०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंग आहे. हा फोन १६३मिमी लांब, ७९मिमी रुंद, ८.१मिमी जाड आहे तर वजन २२५ ग्राम आहे.
Huawei Mate 60 Pro मध्ये १२जीबी रॅम आणि २५६जीबी/ ५१२जीबी /१टीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. फोन हार्मनी ओएस ४.० वर चालतो. ह्यातील ५०००एमएएचची बॅटरी ८८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हा एक आयपी६८ रेटेड फोन आहे, जो १.५ मीटर खोल पाण्यात ३० मिनिटे चालू शकतो. तसेच धुळीपासून देखील सुरक्षित राहू शकतो. ह्यात एआय रिमोट, वायरलेस पेमेंट, ऑल्वेज ऑन डिस्प्ले, ३डी फेस रेकग्निशन, एआय-बेस्ड कॅमेरा इंटेलीजेंस आणि डिस्प्ले आहे.
Huawei Mate 60 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात OIS सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सलचा टेलीफोटो OIS कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
वाचा: Apple कडून आलं निमंत्रण! iPhone 15 Series च्या लाँचची तारीख ठरली
कनेक्टिव्हिटीसाठी Huawei Mate 60 Pro मध्ये यूएसबी ३.१ जनरेशन १ पोर्ट, वाय-फाय ५/वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.२, एनएफसी, सॅटेलाइट कॉलिंग आणि जीपीएस देण्यात आला आहे. Huawei चा पहिला स्मार्टफोन आहे जो सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.