Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- आमदार नीलेश लंके यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट.
- ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने केली चर्चा.
- योग्य त्या कारवाईसाठी अण्णा मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलणार.
वाचा:आत्महत्येचा इशारा देणाऱ्या ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार
आमदार नीलेश लंके यांनी आज अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना देवरे यांच्याविरुद्धच्या चौकशीचा अहवाल सादर केला. यावर त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चाही केली. या वादात लंके यांचे नाव आल्याने त्यांनी हजारे यांच्यासमोर आपली बाजू मांडली. देवरे यांच्याबद्दल अनेक तक्रारी करीत त्यांची कामाची पद्धत चुकीची असल्याचे लंके यांनी हजारे यांना सांगितले. याशिवाय नगरला येण्यापूर्वी त्यांनी कोठे कोठे काम केले, तेथे त्यांचा अनुभव कसा होता, यावरही लंके यांनी हजारे यांना माहिती दिली. हजारे यांनी लंके यांची बाजू ऐकून घेतली. सध्या या प्रकरणाची राज्यभर वेगळी चर्चा आहे. त्यामुळे आपल्या पारनेर तालुक्याची बदनामी होत आहे. वेळ पडली तर आपण यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे हजारे यांनी लंके यांना सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, नीलेश लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन, दत्ता आवरी उपस्थित होते.
वाचा: ‘महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय तिच्या म्हणण्याला किंमत येते कुठे?’
ज्योती देवरे अण्णांना भेटण्याआधीच…
नीलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरीही हजारे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. लंके यांच्या कामाचे हजारे सतत कौतुक करीत असतात. लंके यांचे काम दिवगंत नेते आर. आर. पाटील यांच्याप्रमाणे असल्याचेही हजारे अलीकडचे म्हणाले होते. लंके यांच्या अनेक उपक्रमांत हजारे आवर्जून उपस्थित असतात. त्यावेळीही लंके यांचे हजारे जाहीर कौतुक करतात. या वादाच्या पार्श्वभूमीवर देवरे यांच्याकडून हजारे यांची भेट घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यापूर्वीच लंके यांनी हजारे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली असल्याचे दिसून येते. हजारे यांनी कोणतेही ठोस आश्वासन अगर मतप्रदर्शन केले नसले तरी तालुक्याची बदनामी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
वाचा:तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल!; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा