Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील..

11

तुम्ही जर इंजिनिअरिंग केले असले आणि नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर पदांची भारती होणार आहे. या भरती अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर पदाच्या २२ रिक्त जागा तात्पुरत्या करारावर भरण्यात येणार आहेत. नवी मुंबईतील तळोजा युनिटसाठी ही भरती केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३’ मार्फत नवी मुंबई युनिट साठी भरली जाणारी पदे आणि पदसंख्या:
प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) – १७
प्रोजेक्ट इंजिनिअरI (इलेक्ट्रिकल) – ४
प्रोजेक्ट ऑफिसर – १
एकूण २२ पदे

(वाचा: MPSC Exam News: ‘एमपीएससी’मार्फत होणार महाभरती, ‘या’ पदांच्या संख्येत वाढ करण्याचा मोठा निर्णय..)

पात्रता:

मेकॅनिकल आणि एलेक्ट्रिकल प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी संबंधित विषयातील इंजिनीअरींग पदवी असणे गरजेचे आहे. तर प्रोजेक्ट ऑफिसर या पदासाठी २ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ एमबीए/एमएसडब्ल्यू/पीजीडीएम-एचआर (MBA/MSW/PGDM(HR) अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. तर सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण बंधनकारक आहेत.

वयोमर्यादा:

३२ वर्षापर्यंत. कमाल वयोमर्यादेत इमाव उमेदवारांना – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे तर दिव्यांग उमेदवारांना १० वर्षे सूट आहे.

वेतन:

प्रोजेक्ट इंजिनिअर/ प्रोजेक्ट ऑफिसर पदांसाठी पहिल्या वर्षी ४० हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ४५ हजार रुपये, तिसऱ्या वर्षी ५० हजार रुपये, चौथ्या वर्षी ५५ हजार रुपये याशिवाय सर्व पदांसाठी उमेदवारांना दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये इतर खर्चासाठी दिले जातील.

निवड पद्धती:

पात्र उमेदवारांची आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून पात्र झालेले उमेदवार मुलाखतीसाठी पुढे जातील. लेखी परीक्षेतील गुणांना ८५ टक्के वेटेज व इंटरह्यूमधील गुणांना १५ टक्के वेटेज देऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ ई-मेलद्वारे आणि वेबसाईटवरून कळविण्यात येईल. लेखी परीक्षा कोची येथे घेतली जाईल.

कालावधी:

या भरती प्रक्रियेतून निवडलेल्या उमेदवारांना ३ वर्षांच्या कराराने घेतले जाईल. पुढे कंपनीच्या निर्णयानुसार कराराचा कालावधी १ वर्षांने वाढविला जाईल.

अंतिम निवडयादी www. bel-india.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

अर्जाचे शुल्क:

प्रोजेक्ट इंजिनिअर- क/प्रोजेक्ट ऑफिसर- क पदांसाठी रु. ४७२/- (रु. ४००/- १८ टक्के जीएसटी). अर्जाचे शुल्क भरण्यासाठी ‘Bharat Electronics Limited’ यांचे नावे काढलेला DD जो नवी मुंबई येथे देय असेल. अजा/ अज/ दिव्यांग या राखीव गटातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.

या भरती बाबत शंका असल्यास या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा: namuhr@bel.co.in

विस्तृत माहिती आणि अर्जाचा विहीत नमुना http://www.bel- india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

अर्ज कसा करावा:

अर्जाच्या लिफाफ्यावर ‘ Application for the post of Project Engineer- I (Mechanical/ Electrical ) Project Officer- I( HR)I असे ठळक अक्षरांत लिहावे. सोबत आवश्यक दस्तऐवज जोडू विहीत नमुन्यातील अर्ज २ सप्टेंबर २०२३ पर्यंत पोस्टाने पाठवावे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: ‘मॅनेजर-एचआर, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्लॉट नं. एल – आर, एमआयडीसी, तळोजा, नवी मुंबई, ४१० २०८.

(वाचा: RRC Central Railway Apprentice Recruitment 2023: भारतीय रेल्वेमध्ये २ हजारांहून अधिक पदांची भरती! आजच करा अर्ज..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.