Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iQOO Z7 Pro 5G ची किंमत
iQOO Z7 Pro 5G च्या ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २३,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप मॉडेल ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेजसह २४,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर ५ सप्टेंबरपासून विकत घेता येईल. ज्यावर एचडीएफसी बँक आणि एसबीआय बँक कार्ड धारकांना २,००० रुपयांपर्यंतचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच २,००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळेल.
वाचा: अँड्रॉइडचा बादशहा येतोय बाजारात; Google Pixel 8 सीरीजची लाँच डेट कंपनीनं सांगितली
iQOO Z7 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Z7 Pro 5G मध्ये ६.७८ इंचाचा एचडी प्लस कर्व्ड अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २४०० × १०८० पिक्सल रिजॉल्यूशन, १३०० निट्झ पीक ब्राइटनेस, ९३.३% स्क्रीन टू बॉडी रेश्यो आणि ३००हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.
iQOO Z7 Pro 5G अँड्रॉइड १३ आधारित फन टच ओएस १३ वर चालतो. डिवाइसमध्ये ऑक्टा कोर MediaTek Dimensity 7200 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला ग्राफिक्ससाठी माली जी६१० जीपीयू मिळतो. फोनमध्ये ८जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६ जीबी पर्यंत यूएफएस २.२ इंटरनल स्टोरेज मिळते. ह्यात ८जीबी अतिरिक्त वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील आहे.
वाचा: ह्या फोनवर सलग २० तास बघता येतील रिल्स; iQOO Z8x बद्दल महत्वाची माहिती लीक
फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनसह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो आणि सोबत २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळते.
डिवाइसमध्ये ६६वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४६००एमएएचची बॅटरी आहे. फोनमध्ये वायफाय ६, ब्लूटूथ ५.३, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर ड्युअल सिम ५जी, ४जी सारखे अनेक फीचर्स मिळतात.