Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कम्युनिटी गाईडलाईन्स म्हणजेच समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचा रिपोर्ट समोर आला. यावर जागतिक डेटा दिलेला असतो. दरम्यान यात जानेवारी ते मार्च २०२३ दरम्यान भारतात YouTube च्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे १० लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकण्यात आले. त्या तुलनेत अमेरिकेत ६,५४,९६८ व्हिडिओ काढण्यात आले, तर रशियामध्ये ४,९१,९३३ व्हिडिओ आणि ब्राझीलमध्ये ४,४९,७५९ व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. व्हिडिओ काढण्याच्या बाबतीत, YouTube ने स्पष्टीकरण दिले की, “एक कंपनी म्हणून आमच्या सुरुवातीच्या दिवसांपासून, आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांनी YouTube ला हानिकारक कंटेटपासून संरक्षित केले आहे. “आम्ही मशीन लर्निंग आणि मानवी समीक्षकांच्या संयोजनाचा वापर करून आमची धोरणे लागू करतो.”
जेव्हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला तेव्हा यूट्यूब इंडियाचे संचालक इशान जॉन चॅटर्जी म्हणाले होते की यूट्यूबने समुदाय मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली आहेत, जी प्लॅटफॉर्मवर कोणत्या प्रकारचा कंटेट जाईल हे ठरवत असतात. ते म्हणाले की चुकीच्या माहितीच्या विरोधात कारवाई करणे हे व्यासपीठासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि आम्ही त्यात प्रगती केली आहे. आमचे काम कधीच पूर्ण होत नाही हे आम्हाला माहीत असून आम्ही या क्षेत्रात गुंतवणूक करत राहू असेही ते म्हणाले. यावेळी यूट्यूबने केवळ व्हिडिओच नाही तर जगभरातून सुमारे ८७ लाख चॅनेल हटवले आहेत.
वाचा : तुमचं Google Account कुठे-कुठे केलंय साईन इन? चेक करण्यासाठी ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स