Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चुकून लीक झाली किंमत
आशिया कपच्या एका इव्हेंट दरम्यान इनफिनिक्स झिरो ३० ५जी ची एक जाहिरात डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली, ज्यातून फोनची किंमत समोर आली आहे. जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं होतं की ह्या स्मार्टफोनची किंमत २१,९९९ रुपये असेल. तसेच कंपनीनं देखील हा फोन अलीकडेच २३,९९९ रुपयांमध्ये आलेल्या आयकू झेड७ प्रो स्मार्टफोनला टक्कर देईल ये स्पष्ट केलं आहे.
वाचा: Flipkart Big Bachat Dhamaal Sale: महाबचतीचा सीजन पुन्हा आला, ह्या प्रोडक्ट्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट
Infinix Zero 30 5G चे स्पेसिफिकेशन
इनफिनिक्स झिरो ३० ५जी चा एकच व्हेरिएंट भारतात येईल, ज्यात १२जीबी रॅम आणि २५६जीबी यूएफएस ३.१ स्टोरेज दिली जाईल. हा स्मार्टफोन डायमेन्सिटी ८२०० चिपसेटसह सादर केला जाईल. तसेच अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित एक्सओएस १३ वर चालेल.
झिरो ३० ५जी फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी दिली जाईल. जी ६८ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल, जो ६०एफपीएसवर ४के व्हिडीओ शूट करू शकेल. तर बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात ओआयएस सपोर्ट असलेला १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, १३मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एआय लेन्स असेल. जोडीला क्वॉड एलईडी फ्लॅश मिळेल.
वाचा: जगात सर्वाधिक कोणते फोन विकले जातात? ‘ही’ पाहा यादी
इनफिनिक्स झिरो ३० ५जी मध्ये ६.७८ इंचाचा कर्व एज अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो फुलएचडी+ रिजोल्यूशन, १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ९५० निट्झ पीक ब्राइटनेस मिळते. ह्या पॅनलला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.