Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चकाचक डिस्प्लेसह येतोय Honor 90; अ‍ॅमेझॉनवरुन होणार विक्री

15

ऑनरचा नवीन स्मार्टफोन Honor 90 भारतात येणार आहे अशी माहिती गेले कित्येक दिवस समोर येत आहे. लीक मधून लाँच डेट देखील समोर आली आहे आणि आता अ‍ॅमेझॉनवर आलेल्या नव्या टीजरमुळे लाँच कंफर्म झाला आहे. तसेच हा डिवाइस कोणत्या ई-कॉमर्स साइटवर विकला जाईल हे देखील समजलं आहे.

Honor 90 अ‍ॅमेझॉन लिस्टिंग

ई-कॉमर्स साइटवर एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे, ज्यातून Honor 90 फोनच्या डिस्प्ले आणि सॉफ्टवेयरची माहिती देण्यात आली आहे. लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की ऑनर ९० मध्ये अल्ट्रा-नॅरो बेजलसह क्वॉड-कर्व्ड डिस्प्ले मिळेल.
डिस्प्ले पॅनलमध्ये १.५के रेजॉल्यूशन, १६०० निट्झ ब्राइटनेस आणि DCI-P3 कलर गमुटचा सपोर्ट दिला जाईल. हा फोन मॅजिकओएस ७.१ सह अँड्रॉइड १३ वर आधारित असेल.

वाचा: रेडमी-रियलमीची सुट्टी करण्यासाठी सॅमसंगची तयारी सुरु; सर्वात स्वस्त सीरिजमधील Galaxy A05 आला समोर

कधी येणार Honor 90

आता पर्यंत आलेल्या लीकनुसार हा डिवाइस भारतात २१ सप्टेंबरला लाँच केला जाऊ शकतो. पंरतु कंपनीनं ह्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. पंरतु ह्या टीजरमुळे हा फोन ह्याच महिन्यात येणार हे नक्की झालं आहे.

Honor 90 चे स्पेसिफिकेशन्स

हा मोबाइल चीनमध्ये सादर झाला आहे, त्यामुळे ह्याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स उपलब्ध आहेत.
Honor ९० मध्ये युजर्सना ६.७ इंच कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो १.५के रेजोल्यूशन, १२० हर्टझ रिफ्रेश रेट, ३८४० हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्ट करतो.

Honor 90 मध्ये कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेट वापरला आहे. जोडीला १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सपोर्ट आहे. हा मोबाइल चीनमध्ये अँड्रॉइड १३ आधारित मॅजिकयुआय ७.१ वर चालतो. त्याचबरोबर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय ६, यूएसबी टाइप-सी २.०, ब्लूटूथ ५.२ सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचा: Flipkart Big Bachat Dhamaal Sale: महाबचतीचा सीजन पुन्हा आला, ह्या प्रोडक्ट्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट

Honor 90 फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्टसह २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कालिंगसाठी ५० मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी ६६ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.