Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बीए एमएमसी सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर; आजवर उन्हाळी सत्राचे २०२ निकाल जाहीर

15

Mumbai University BA MMC Result: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या जून २०२३ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या आंतर विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीए एमएमसी (Multimedia And Mass Communication) सत्र ६ (BA MMC Sem 6) या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

बीए एमएमसी सत्र ६ च्या परीक्षेमध्ये एकूण १ हजार १४२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ३ हजार ४२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ३६७ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर ५५ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच, या परीक्षेत १ हजार १२२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बीए एमएमसी सत्र ६ चा निकाल ५०.४४ टक्के लागला आहे.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२३ च्या उन्हाळी सत्राचे २०२ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

(वाचा : डेटा सायंटिस्ट बनून डेटा सायन्समध्ये करियर घडवायचे आहे; ही दहा कौशल्य आत्मसात करा)

आतापर्यंत २०२ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राचे आतापर्यंत विद्यापीठाने २०२ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आज विद्यापीठाने तृतीय वर्ष बीए एमएमसी सत्र ६ चे निकाल जाहीर केले आहेत.

नोंदणीकृत विद्यार्थी : ३ हजार ४२२ विद्यार्थी

उपस्थित विद्यार्थी : ३ हजार ३६७ विद्यार्थी

गैरहजर विद्यार्थी : ५५ विद्यार्थी

उत्तीर्ण विद्यार्थी : १ हजार १४२ विद्यार्थी

अनुत्तीर्ण विद्यार्थी : १ हजार १२२ विद्यार्थी

उत्तीर्णतेची टक्केवारी : ५०.४४ टक्के

(वाचा : कामाच्या भरपूर संधी आणि पैसे कमवण्याच्या उत्तम संधी देणारे ‘डिजिटल एज’ तुम्हाला माहिती आहे का?)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.