Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खिशाला परवडणाऱ्या किंमतीत येतोय शानदार स्मार्टफोन; OPPO A38 ची किंमत लाँचपूर्वीच झाली लीक

11

ओप्पो आपल्या ‘ए’ सीरिजमध्ये स्वस्त स्मार्टफोन सादर करत असते. त्यात आता आणखी एका स्मार्टफोनची भर पडणार आहे. लवकरच OPPO A38 नावाचा हँडसेट भारतीय बाजारात येणार आहे. हा एक ४जी फोन असेल जो लो बजेट सेग्मेंटमध्ये येईल. जरी कंपनीनं ओप्पो ए३८ च्या लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही तरी बातम्या येत आहेत. आता ह्या स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे.

OPPO A38 ची किंमत

इतर कंपन्या ५जी फोन घेऊन येत असताना ओप्पो ए३८ मध्ये ४जी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे हा नक्कीच बजेट स्मार्टफोन असेल हे निश्चित झालं आहे. आता आलेल्या बातमीनुसार OPPO A38 स्मार्टफोनची किंमत भारतात १२ हजार रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते. ही स्मार्टफोनच्या ४जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत असू शकते. हा मोबाइल सप्टेंबरमध्ये येऊ शकतो.

वाचा: Instagram वर तुम्हीही रिल पोस्ट करता? ही नवीन अपडेट नक्की जाणून घ्या

OPPO A38 चे लीक स्पेसिफिकेशन्स

ओप्पो ए३८ मध्ये १६१२ × ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेला ६.५६ इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल. हा एलसीडी पॅनल ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १६.७एम कलरला सपोर्ट करेल.

OPPO A38 अँड्रॉइड १३ आधारित कलरओएस १३ वर चालेल. प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी८० ऑक्टाकोर प्रोसेसर असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे. जोडीला ४जीबी रॅम लाँच आणि १२८जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. ह्यापेक्षा जास्त व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे.

फोटोग्राफीसाठी ह्यात ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो. OPPO A38 च्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाऊ शकते. तर फ्रंटला ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

वाचा: २२ हजारांच्या बजेटमध्ये Asus चे दोन शानदार लॅपटॉप लाँच; विद्यार्थ्यांसाठी आहेत बेस्ट

पावर बॅकअपसाठी OPPO A38 स्मार्टफोनमध्ये ५,०००एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. जी १०वॉट फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकते. ओप्पो ए३८ स्मार्टफोन आयपी५४ रेटिंगसह बाजारात येऊ शकतो. ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एनएफसी, ३.५मिमी जॅक, यूएसबी-सी पोर्ट व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळू शकतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.