Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भव्यदिव्य सुभेदार सिनेमाची कोट्यवधींची कमाई, पण बजेटचा आकडा वाचून वाटेल आश्चर्य

115

मुंबई: शिवराज अष्टकातल्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चारही चित्रपटांच्या घवघवीत यशातून लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवकालावर बेतलेल्या ऐतिहासिक चित्रपटांवरची आपली मजबूत पकड दाखवून दिली. बंदिस्त पटकथा, दमदार संवाद, दिग्गज कलाकारांचा अभिनय, तंत्रकुशल टीम आणि जबरदस्त दिग्दर्शनाची जोड असल्यानं शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प ‘सुभेदार’ या चित्रपटाबद्दल असणारी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्यासह देशाच्या विविध शहरांत; तसंच इतर सहा देशांत ‘सुभेदार’ प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला सगळीकडंच जोरदार प्रतिसाद मिळतो आहे.
ओठ आणि डोळ्यांखाली सर्जरी केली खरी पण भलतंच झालं, जावेद जाफरींच्या लेकीने सांगितलं सगळं सत्य

प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात सिनेमातनं ८ कोटी ७४ लाखांची कमाई केली होती. सोमवार पर्यंत सिनेमाची कमाई १० कोटींच्या वर जाईल, असं म्हटलं जात आहे. पहिल्या आठवड्यात सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी, बॉलिवूडच्या सिनेमांमुळं मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे मोठे सिनेमे नसते तर, कदाचित हे आकडे आणखी चांगले असते.

बजेट किती?
तर सुभेदार सिनेमाचं बजेट हे १० कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जात आहे. दुसऱ्या आठवड्यांतही बॉक्स ऑफिसवर जम बसवला तर सिनेमा आणखी चांगली कमाई करू शकतो.
पैसे नसतील तर त्यांना निर्माता का म्हणावं,लाखो रुपयांचं मानधन थकवल्यानं पुन्हा संतापला शशांक केतकर
शिवरायांनी आपल्या शूर शिलेदारांच्या साह्यानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षातही उतरवलं. महाराजांच्या शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या या शिलेदारांचा इतिहास रूपेरी पडद्यावर अपवादानंच मांडला गेला. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा हाच जीवनपट ‘सुभेदार’ या चित्रपटातून आपल्यासमोर आला आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचं कल्याणकारी जीवनकार्य आणि स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणाऱ्या या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘ए. ए. फिल्म्स’ आणि ‘एव्हरेस्ट एंटरटेंन्मेंट’ची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ या चित्रपटाची निर्मिती ‘राजवारसा प्रॉडक्शन्स’, ‘मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि,’ ‘पृथ्वीराज प्रॉडक्शन्स’, ‘राजाऊ प्रॉडक्शन’, ‘परंपरा प्रॉडक्शन्स’ यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.