Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वनप्लसची डोकेदुखी वाढवण्याची तयारी; Vivo V29 5G लवकरच येऊ शकतो भारतात, स्पेक्स आले समोर

17

Vivo नं काही दिवसांपूर्वी Vivo V29e स्मार्टफोन भारतात सादर केला होता. जो स्नॅपड्रॅगन ६९५ सह ५० मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. परंतु ह्या सीरिजचा हा एकमेव फोन नाही लवकरच Vivo V29 5G देखील जागतिक बाजारात लाँच होणार आहे. फोन भारतासह जागतिक बाजारात उपलब्ध होईल. ह्या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशनही समोर आले आहेत.

Vivo V29 5G भारतात लवकरच लाँच होऊ शकतो. फक्त भारतात नव्हे तर इतर देशांमध्ये देखील हा फोन येईल. टिपस्टर पारस गुगलानीनं ही माहिती दिली आहे. टिपस्टरनुसार हा ५जी फोन जागतिक बाजारात उपलब्ध होऊ शकतो. Vivo V29 5G चेक रिपब्लिकमध्ये सर्वप्रथम उपलब्ध आहे. ह्या फोनसह Vivo V29 Pro लाँच होण्याची शक्यता आहे कारण प्रो मॉडेलला BIS सर्टिफिकेशन मिळालं आहे.

वाचा: WhatsApp बंद करण्याचा Elon Musk नं विडा उचलला! जुकरबर्गच्या अडचणीत वाढ, युजर्सची मात्र चांदी

Vivo V29 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo V29 5G फोनमध्ये ६.७८ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. जो १.५के रिजॉल्यूशन, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १.०७ बिलियन कलर्स सपोर्टसह येऊ शकतो. ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेट दिला जाऊ शकतो. जोडीला १२ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज मिळू शकतो. फोनमध्ये ४,६००एमएएचची बॅटरी ८०वॉट फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते. ह्यात अँड्रॉइड १३ आधारित फनटच ओएस १३ मिळू शकतो.

फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ओआयएस सपोर्टसह ५० मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. जोडीला ८ मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर एलईडी फ्लॅशसह येऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

Vivo V29e ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V29e ची किंमत २६,९९९ रुपयांपासून सुरु होते. Vivo V29e मध्ये ६.७८ इंचाच डिस्प्ले देण्यात आला आहे जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३०० निट्झ पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनमध्ये OISसपोर्टसह ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे. जोडीला ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

वाचा: खिशाला परवडणाऱ्या किंमतीत येतोय शानदार स्मार्टफोन; OPPO A38 ची किंमत लाँचपूर्वीच झाली लीक

विवोच्या ह्या स्मार्टफोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ४४वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट. करते हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसरसह आला आहे. जो अँड्रॉइड १३ वर आधारित फनटच ओएस १३ वर चालतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.