Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ४२
पदनिहाय जागांचा तपशील :
- लघुलेखक (निम्नश्रेणी) : ०६ जागा
वेतनस्तर (एस १४ : ३८,६०० ते १,२२,८००)
- वरिष्ठ लिपीक : २९ जागा
वेतनस्तर (एस ८ : २५,५०० ते ८१,१००)
- निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक, तांत्रिक) : ०७ जागा
वेतनस्तर (एस ८ : २५,५०० ते ८१,१००)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
(वाचा : ICG Recruitment 2023: भारतीय तटरक्षक दलात काम करायचे आहे; १ सप्टेंबरपासून सुरु होणार भरती प्रक्रिया)
शैक्षणिक पात्रता :
लघुलेखक : १० वी पास + मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. (शब्द प्रति मिनिट) व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वरिष्ठ लिपीक : कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्लिश टंकलेखन ४० श.प्र.मि. + ३ वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक.
निदेशक : यंत्र/ स्थापत्य/ विद्युत/ अणुविद्युत/ अणुविद्युत व दूरसंचरण किंवा अणुविद्युत व संचरण/ संगणक/ संगणक तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ रसायन/ रसायन तंत्रज्ञान/ उपकरणीकरन/ औद्योगिक अणुविद्युत/ स्वयंमचल विषयातील अभियांत्रिकी पदविका + १ वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
(शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी DTE च्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहीरात पाहा)
वयोमर्यादा :
तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिपत्याखाली महाराष्ट्रातील विविध कार्यालयांमध्ये ‘गट क’ वर्गातील जागांसाठी राबवण्यात येणार्या या पदभरतीमध्ये खालील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
किमान वयोमर्यादा :
१. निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी वय १८ वर्षे पूर्ण
२. वरिष्ठ लिपीक या पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी वय १९ वर्षे पूर्ण
३. निदेशक पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी १९ वर्षे पूर्ण
(वाचा : MRVC Recruitment 2023: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; थेट मुलाखातीमधून पार पडणार निवड प्रक्रिया)
कमाल वयोमर्यादा :
१. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ३८ वर्षे
२. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी : ४३ वर्षे
३. खेळाडूंना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची शिथिलता देऊन, ही कमाल वयोमार्यादा ४३ वर्षे असेल.
४. माजी सैनिकांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देऊन, ही कमाल वयोमार्यादा ४३ वर्षे ठेवण्यात आली आहे.
५. दिव्यांग माजी सैनिकांना कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे ठेवण्यात आली आहे.
(वयोमर्यादेविषयी अधिक महितीसाठी मूळ जाहीरात पाहा)
परीक्षा शुल्काविषयी :
- आराखीव प्रवर्गातून अर्ज करणार्या उमेदवारांना सामायिक शुल्क १०००/- रुपये व मागासवर्गीय उमेदवारांकरिता सामायिक शुक्ल ९००/- रुपये राहील.
- माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्कात सूट देण्यात आली आहे.
- सादर परीक्षा शुल्क ऑनलाइनपद्धतीने भरणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज्ज केल्यास प्रत्येक पदासाठी वेग-वेगळे परीक्षा शुल्क भरणे अनिवारी असणार आहे.
- परीक्षा शुल्का ना परतावा (Non Refundable) असेल.
महत्वाच्या तारखा:
० ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणीला सुरवात : ३१ ऑगस्ट २०२३ सकाळी ११.०० पासून
० ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख : २१ सप्टेंबर २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत
० ऑनलाइन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी : २२ सप्टेंबर २०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत
महत्त्वाचे :
- उमेदवारांनी http://ibpsonline.ibps.in.dtedjun2023/ या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणार्या उमेदवारला सादर परीक्षेसाठी व या पुढील परीक्षा / निवडीसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
- महाराष्ट्र शासनाच्या, तंत्रशिक्षण विभागातील ‘गट क’मधील रिक्त पदांच्या अर्ज प्रक्रियेतील आरक्षण, आवश्यक कागदपत्र, परीक्षेचे स्वरूप, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व इतर महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी शासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहीरात वाचा.
- शिवाय, सदर जाहीरातीचा संपूर्ण तपशील कार्यालयाच्या www.jdteromumbai.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : AICTS Pune Recruitment 2023: आठवी पास ते पदवीधारकांसाठी पुण्यात नोकरी संधी; ‘या’ शासकीय संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी)