Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ हा चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीनंतर दोन्ही देशातील लोकांमध्ये वाढलेल्या कटुतेवर आधारीत आहे. या चित्रपटात पाकिस्तानी आर्मी ऑफिसर हिंदुस्थानच्या तारा सिंहच्या रक्तासाठी तहानलेला आहे. पण या इच्छेचा शेवट त्याच्यासाठी खूप वाईट ठरतो. चित्रपटाची ही कथा लोकांना खूप आवडली आहे. ‘गदर २’ ने २४ व्या दिवशी ८.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या हा सिनेमा बॉलिवूडचा नंबर १ चित्रपट बनण्याच्या शर्यतीत वेगाने पुढे जात आहे. बॉक्स ऑफिस स्टॅटिस्टिक्स साइट Sacnilk नुसार, चित्रपटाने चौथ्या रविवारपर्यंत एकूण ५०१.८७ कोटींची कमाई केली आहे.
‘गदर २’ ची जागतिक कमाई जबरदस्त
‘गदर २’च्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाले तर, २४ दिवसांत ६५५ कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने २३ दिवसांत ६४६.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर भारतातील एकूण कलेक्शन ५८२.२० कोटी रुपये आणि नेट कलेक्शन ४९३.३७ कोटी रुपये आहे.
पठाणच्या थोडा मागे राहिलाय गदर २
‘गदर २’ बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘पठाण’ला मागे टाकण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ‘पठाण’ने भारतात एकूण ५४३.०९ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात भरपूर नफा कमावला होता आणि जगभरात १०५०.०५ कोटींची कमाई केली होती. तर ‘गदर २’ला परदेशी बॉक्स ऑफिसवर फारसा फायदा मिळत नाहीये. मात्र, जिथे ‘पठाण’ २५० कोटींच्या बजेटमध्ये बनला होता, तिथे ‘गदर २’ फक्त ७५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.