Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन्स २०२४ परीक्षेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु मागील वर्षीचा कल पाहता, यंदाच्या परीक्षेच्या संभाव्य तारखांचा अंदाज लावला जाऊ शकतो. येत्या काही दिवसांमध्येच NTA, यावर्षीच्या JEE Main 2024 साठी नोंदणी सुरू करण्याची शक्यता आहे.
यादिवशी होणार नोंदणीला सुरुवात :
जेईई मेन 2024 साठी नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. एनटीएच्यावतीने परीक्षेच्या अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, मागील वर्षीचा आणि यापूर्वीचा ट्रेंड पाहता जेईई मेन २०२४ ची नोंदणी प्रक्रिया डिसेंबर महिन्याच्या सऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते.
(वाचा : Career In Geography: भौगोलिक क्षेत्राशी निगडीत विषयात करिअर करायचे आहे? या क्षेत्रात नोकरीचे टेंशन नाही)
जेईई मेन्स २०२४ परीक्षेची तारीख :
जेईई मेन्स २०२४ परीक्षेची नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू होणे अपेक्षित आहे. तर, नोंदणीसाठीची शेवटची तारीख जानेवारी २०२४ असू शकते. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म दुरुस्तीची शेवटची तारीख जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यातील असून, पुढील सत्रात फेब्रुवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.
जेईई मेन्स २४ साठी पात्र कोण?
पीसीएम (PCM : Physics, Chemistry and Math’s) विषयासह बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारच या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. JEE Mains साठी अर्ज करणारे उमेदवार भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Math’s) विषय शिकलेले असणे आवश्यक आहे. जेईई परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणारे जेईईअॅडव्हान्स्ड परीक्षेला बसू शकतात.
(वाचा : DTE Maharashtra Recruitment 2023: शासनाच्या तंत्रशिक्षण विभागात नोकरीची संधी; दहावीपास ते पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी)
‘या’ वेबसाइटवर मिळणार अधिकृत माहिती :
जेईई मेन्स परीक्षेसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी JEE Main च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर माहिती मिळेल. या संकेतस्थळावरून अर्ज केले जातील आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती तुम्हाला या वेबसाइटवर मिळेल. नवीन अपडेटसाठी वेळोवेळी वेबसाईट तपासत रहा.
(वाचा : ‘एक परीक्षा एक कट ऑफ’ साठी आमदार रोहित पवार आग्रही; सरळसेवा भरतीसाठी One Time Registration तर, परीक्षेसाठी कमी शुल्क घेण्याची मागणी)