Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आज शिक्षक दिन! जाणून घ्या हा दिवस भारतात का आणि कशासाठी साजरा केला जातो..

15

Teachers Day History: आयुष्यातले पहिले शिक्षक म्हणजे आपले आई वडील आणि त्यांच्यानंतर आपल्याला घडवतात ते आपले शाळेतले शिक्षक. अगदी बालवर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत आयुष्यात अनेक शिक्षक येतात आणि वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वाट दाखवत असतात. या प्रवासात काही शिक्षक आपल्या पालकांइतकेच जवळचे होतात. अशा शिक्षकांचा गौरव करण्याचा, त्यांच्याप्रती प्रेम, आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आजचा शिक्षक दिन..

आपल्या शिक्षकांप्रती आपल्या मनात कायम आदर असतोच पण आजचा दिवस खास त्यासाठीच असल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. आज सर्वजण आवर्जून आपल्या शिक्षकांना भेटतात, आठवणींना उजाळा देतात. पण हा दिवस का साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? यामागेही एक इतिहास आहे, एक गोष्ट आहे. तेच आज जाणून घेऊया, नेमका शिक्षण दिन का आणि कशासाठी साजरा केला जातो…

भारतामध्ये शिक्षक दिन हा ५ सप्टेंबर रोजी, भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून साजरा केला जातो. पण यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याच जन्मदिनाचे निमित्त का? हे आपण माहीत करून घेऊया…

(वाचा: MIDC Recruitment 2023: मुंबई ‘एमआयडीसी’ मध्ये मेगाभरती! गट अ, ब आणि क संवर्गातील नोकर्‍यांसाठी आजच करा अर्ज..)

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशकार्यात, राजकारणात आपल्या कामाचा ठसा उमटवलाच शिवाय शिक्षण क्षेत्रात त्यांनी विशेष योगदान दिले. ते स्वतः शिक्षक होते आणि त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख जपली. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे ते देशाचे उपराष्ट्रपती आणि मग राष्ट्रपतीही झाले. जगभरातील शिक्षकांचे योगदान जगापुढे यावे म्हणून एक दिवस हा शिक्षकांसाठी म्हणून साजरा करायला हवा आणि तो ५ सप्टेंबर असावा असा प्रस्ताव त्यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विद्यार्थ्यांनी मांडला आणि पुढे हा दिवस शिक्षक म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते की, ‘शिक्षकांमध्ये देश घडवण्याची ताकद असते. त्यांनी सर्वांपेक्षा बुद्धीमान असयला हवे. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणे माझ्यासाठी गौरवास्पद असेल.’

रशियामध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत ऑक्टोबर महिन्यातील पहिला रविवार शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात होता. परंतु ११९४ मध्ये युनेस्कोने ५ ऑक्टोबर हा दिवस आंतराराष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून जाहीर केला. युनेस्कोच्या निर्णयानंतर रशियानेही ५ ऑक्टोबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून स्वीकारला. अजूनही अनेक देशात वेगवेगळ्या तारखांना शिक्षक दिन साजरा केला जातो. परंतु भारतात मात्र ५ स्पटेंबर हा शिक्षक दिन म्हणून मोठ्या स्तरावर साजरा केला जातो.

(वाचा: UGC Latest News: ‘यूजीसी’चा मोठा निर्णय! आता पदवी प्रमाणपत्रात होणार महत्वाचा बदल.. वाचा सविस्तर..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.