Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई विद्यापीठात शिक्षक दिनी उत्कृष्ट महाविद्यालय, आदर्श प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण
संशोधनाद्वारे समाजजीवन सुसह्य व्हावे आणि विद्यापीठात संशोधन संस्कृतीला चालना आणि बळकटी देण्यासाठी संशोधनातील उत्कृष्टतेबद्दल पुरस्कार दिले जाणार आहेत. विद्यापीठातील उत्कृष्ट संशोधक पुरस्कारांसाठी एच-इंडेक्स, सायटेशन अशा अनुषंगिक बाबींसह उत्कृष्टतेचे सर्वंकष निकष समीतीमार्फत तपासले जाणार आहेत. त्याचबरोबर संशोधन प्रकल्पासाठी विविध संस्था, कन्सलटन्सी, शिखर संस्थेकडून सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्यांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे. उत्कृष्ट विभाग पुरस्कारांतर्गत विद्यापीठाने शैक्षणिक वर्षांत केलेल्या भरीव आणि उल्लेखनिय कामगिरीच्या निकषावर पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठातर्फे आज शिक्षक दिन आणि पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध प्राधिकरणातील सदस्य, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना संबोधित करताना माजी कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीसमोरील उभी असलेली आव्हाने आणि संधी याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. नाविन्यतेचा ध्यास घेऊन तंत्रज्ञानाधिष्ठित पीढी निर्माण करण्यावर भर देण्यात यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठातर्फे उत्कृष्ट महाविद्यालय, आदर्श प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये २०२१-२२ साठी शहरी विभागातून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार रॉयल कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, मीरा रोड आणि एस.एम.शेट्टी कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, पवई, यांना प्रदान करण्यात आला तर, ग्रामीण विभागातून सुंदरराव मोरे आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स सिनियर कॉलेज, पोलादपूर, रायगड याना प्रदान करण्यात आला. शैक्षणिक २०२२-२३ साठी शहरी विभागातून आर.डी. नॅशनल कॉलेज ऑफ अँड डब्लु. ए. सायन्स कॉलेज वांद्रे, मुंबई आणि ग्रामीण विभागातून सेंट. जॉन इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पालघर, सेंट. जॉन टेक्निकल कॅम्पस, वेवूर, पालघर यांना देण्यात आला.
आदर्श प्राचार्य पुरस्कार २०२१-२२ शहरी विभागाकरीता डॉ. निलम अरोरा,लाला लजपतराय, वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, महालक्ष्मी आणि ग्रामीण विभागाकरीता डॉ. चंद्रकांत सिताराम काकडे, महाराणा प्रताप शिक्षण संस्था, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी यांना देण्यात आला. २०२२-२३ साठी शहरी विभागातून आदर्श प्राचार्य पुरस्कार राजेंद्र दत्तात्रय शिंदे, सेंट झेवियर महाविद्यालय, मुंबई आणि ग्रामीण विभागातून डॉ. अरविंद कुलकर्णी न्यू एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा यांना प्रदान करण्यात आले.
२०२१-२२ साठी आदर्श शिक्षक/शिक्षिका पुरस्कार शहरी विभागाकरीता डॉ. विकास महादेव फल्ले, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, माटुंगा आणि ग्रामीण विभागाकरीता डॉ. वंदना चंद्रकांत काकडे, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी यांना प्रदान करण्यात आला.
२०२२-२३ शहरी विभागातून डॉ. अंजली अ. कासले भारती विद्यापीठ, इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, नवी मुंबई आणि ग्रामीण विभागातून डॉ. प्रल्हाद ज्ञानोबा गाथाडे, नवनिर्माण शिक्षण संस्था, लक्ष्मीबाई सिताराम हलबे महाविद्यालय आणि डॉ. मऱ्याप्पा चुडाप्पा सोनावले, वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फुंडे तर विद्यापीठ विभागातून २०२१-२२ साठी विद्यापीठ विभागातून डॉ. विनायक शामराव कुलकर्णी, गणित विभाग, मुंबई विद्यापीठ यांचा गौरव करण्यात आला.
गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार २०२१-२२ साठी शहरी विभागातून श्रीमती कल्पना शेखर दिवेकर, मालाड कांदिवली एज्युकेशन सोसायटीचे नागिनदास महाविद्यालयाचे कला आणि व्यवस्थापन महाविद्यालय आणि शांतीबेन नागिनदास खांडवाला विज्ञान मालाड आणि ग्रामीण विभागातून श्री. तानाजी नामदेव घ्यार, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण रायगड यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच, २०२२-२३ साठी शहरी विभागातून श्री. चेतन अमृत पाटील, उत्तरी भारत सभा रामानंद आर्या डी. ए. व्ही. महाविद्यालय, भांडुप आणि ग्रामीण विभागातून श्री. योगेश जयचंद ठाकूर, नवनिर्माण शिक्षण संस्था, लक्ष्मीबाई सिताराम हलबे महाविद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, दोंडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग यांना सन्मानित करण्यात आले.
श्रीमती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२२-२३ साठी ग्रामीण विभागातून डॉ. श्रीमती चित्रा मिलिंद गोस्वामी आर. पी. गोगटे वाणिज्य महाविद्यालय, रत्नागिरी आणि विद्यापीठ विभागातून २०२१-२२ साठी डॉ.अर्चना मलिक गौरे, तत्वज्ञान विभाग, मुंबई विद्यापीठ यांना पुरस्कारांने गौरविण्यात आले.