Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अनावश्यक नोटिफिकेशन बंद करा
स्मार्टवॉचवर वारंवार येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे बॅटरी संपते. जर तुमच्याकडे अनेक अॅप्स असतील तर त्यांच्या नोटिफिकेशनमुळे बॅटरी लवकर संपते. अशावेळी स्मार्टवॉचवर जाऊन अनावश्यक अॅप्ससाठी नोटिफिकेशन बंद करा. ह्यात गेम, सोशल मीडिया अॅप्स इत्यांदींचा समावेश असू शकतो.
वाचा: लुकमध्ये अगदी Apple Watch Ultra, किंमत फक्त २,२९९ रुपये, Boat Wave Elevate भारतात लाँच
ब्राइटनेस कमी ठेवा
तुमच्या स्मार्टवॉचची बॅटरी लाइफ वाढवण्याचा एक सोपा मार्ग आहे, तो म्हणजे स्क्रीनची ब्राइटनेस कमी करा. स्क्रीनची ब्राइटनेस जास्त असल्यामुळे बॅटरी लवकरच संपते. जर तुमच्याकडे मोठी स्क्रीन असलेलं स्मार्टवॉच असेल तर त्याची ब्राइटनेस कमी करणं सर्वात महत्वाचं आहे.
GPS बंद करा
तुमच्या स्मार्टवॉचची बॅटरी लाइफ वाढवण्याचा हमखास मार्ग म्हणजे GPS बंद करणे. GPS चा वापर वॉचवर मॅप्स, फिटनेस ट्रॅकिंग, आणि नेव्हिगेशन सारख्या कामांसाठी केलं वाजतो. त्यामुळे तुमच्याकडे जीपीएस एनेबल्ड स्मार्टवॉच असेल तर हे फिचर तेव्हाच वापरा जेव्हा आवश्यकता असेल. इतर वेळी बंद करा.
पॉवर सेव्हिंग मोड ऑन करा
तुमच्या स्मार्टवॉचची बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी तुम्ही पावर सेव्हिंग मोडची मदत घेऊ शकतो. नावावरून तुम्हाला समजलं असेल की पावर सेव्हिंग मोड तुमच्या वॉचची बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी डिजाइन करण्यात आला आहे. हा मोड सर्व बॅकग्राउंड अॅप्स बंद करतो, ज्यामुळे बॅटरी कमी वापरली जाते.
वाचा: Xiaomi Uniblade ट्रिमर लाँच! मिळेल ट्रिम आणि शेवचा ऑप्शन, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
सॉफ्टवेयर अपडेट करा
तुमच्या स्मार्टवॉचचं सॉफ्टवेयर अपडेट करणं अत्यावश्यक आहे. सॉफ्टवेयर अपडेटमुळे फक्त नवीन फीचर्स आणि सुधारणा होत नाहीत तर तुमच्या वॉचची सुरक्षा आणि स्थैर्य वाढते. जास्त बॅटरी वापरणारे बग्स देखील कंपनी अपडेटद्वारे काढून टाकत असते.