Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मातृभाषेत शिक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही; सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाद

75

Education In Mother Tongue: मातृभाषेतून शिक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मराठी भाषेत शिक्षण आणि त्यासाठी याच भाषेत पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व विद्यापीठांमधील सायन्स आणि कॉमर्स (Science and Commerce) शाखेची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत विद्यापीठांना देण्यात आलीये.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार, हा निर्णय घेण्यात आल्यानंतरही अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मराठीत भाषेतील पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचे चित्र असल्यामुळे , सप्टेंबर अखेरपर्यंत विज्ञान आणि वाणिज्य शाखेची मराठीत अनुवादन (Translation) केलेली पुस्तके विद्यापीठांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहेत.

(वाचा : IIT Kanpur SIKSA: इंजिनियर्स आता संस्कृत, योग, गणित या विषयांचेही शिक्षण घेणार; IIT मध्ये नव्या अभ्यासक्रमाची भर पडणार)

मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये (Colleges and University) इंग्रजी अभ्यासक्रम लवकर आत्मसात करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अनेकदा अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजण्यास मदत व्हावी आणि विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन शासनाने मातृभाषेतून शिक्षण घेण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे . अभ्यासक्रमातील विविध बाबींच्या संदर्भासाठी मराठीत ट्रान्सलेट केलेली पाठ्यपुस्तके उपयोगात पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात मातृभाषेतून पुस्तकं उपलब्ध होणार

  • मुंबई आयआयटीकडून विद्यापीठांना मराठीत भाषांतर केलेली पुस्तकं उपलब्ध होणार आहेत.
  • त्यासाठी उच्च शिक्षण विभागाने मुंबई आयआयटीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
  • करारानुसार, शिक्षण विभागाने विद्यापीठांना भाषांतर करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, अर्ध शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आले तरीही विद्यार्थ्यांना भाषांतर केलेली पुस्तके उपलब्ध झाली नाहीत.
  • त्यामुळे ही पुस्तके लवकरात लवकर विद्यापीठांना उपलब्ध करुन द्यावी लागणार आहेत. त्यासाठी मुदतवाद देण्यात आली आहे.
  • शिक्षण विभागाच्या या सूचनेमुळे भाषांतराचे काम वेगाने सुरु आहे.
  • तसेच, या सूचनेमुळे विद्यापीठांना पुढील दोन आठवड्यांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील किमान दहा पुस्तके तरी भाषांतरीत करावी लागणार आहेत.
  • तसे न झाल्यास योग्य ती पाऊले उचलली जाणार असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

शिक्षण विभागाकडून परित्रपक जारी :

या संदर्भातील माहिती देणार्‍या परिपत्रकाच्या माध्यमातून विद्यापीठांना निर्देश देण्यात आले आहेत. सध्या राज्यात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना मराठीतून पाठ्यपुस्तकं उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर माध्यमांना दिली.

(वाचा : PGCIL Recruitment 2023: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये डिप्लोमा ट्रेनीसाठी पदभरती; असा करा अर्ज)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.