Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सॅमसंग फोन्स स्वस्तात विकत घेण्याची संधी, Galaxy A54 5G आणि A34 5G वर मिळत आहे खास डिस्काउंट

9

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण आघाडीची स्मार्टफोन ब्रँड कंपनी सॅमसंग आपल्या दोन फोन्सवर अप्रतिम ऑफर देत आहे. Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G स्मार्टफोन्सवर इन्स्टंट कॅशबॅक देत आहे. या फोन्सवर काय ऑफर दिल्या जात आहेत आणि त्यांची नवीन किंमत काय असेल, जाणून घेऊ…

Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G ची किंमत आणि ऑफर:
Galaxy A34 5G ३०,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला. यावर २ हजार रुपयांच्या झटपट कॅशबॅकसह आणि २ हजार रुपयांच्या अतिरिक्त बँक सवलतीसह किंमत २६,९९९ रुपये होत आहे. जर तुम्हाला Galaxy A54 खरेदी करायचा असेल तर त्याच्या 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४०,९९९ रुपये आहे. हे तुम्ही २ हजार रुपयांच्या इन्स्टन्ट कॅशबॅकसह आणि २ हजार रुपयांच्या अतिरिक्त बँक सवलतीसह ३६,९९९ रुपयांना खरेदी करु शकता. ही ऑफर फक्त ICICI आणि SBI कार्डवर उपलब्ध असेल. १२ महिन्यांच्या नो कॉस्ट
EMI सह झिरो डाउन पेमेंटसह देखील फोन खरेदी करता येईल.

Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G चे फीचर्स
दोन्ही फोन फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्लेसह येतात, ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2400 X 1080 आहे. त्यांचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. Galaxy A54 मध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले आहे आणि Galaxy A34 मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले आहे. दोन्ही फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतात. यात 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे. हे दोन्ही फोन Android 13 वर आधारित One UI 5.1 वर काम करतात. Galaxy A54 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर ५० मेगापिक्सेलचा आहे. दुसरा १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आहे. तिसरा ५ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. Galaxy A34 मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर ४८ मेगापिक्सेलचा आहे. दुसरा ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आहे. तिसरा ५ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G मध्ये 5000 mAh बॅटरी आहे. तसेच, फोन्सना IP67 रेटिंग देण्यात आली आहे.

वाचा : iPhone 15 सिरीज असणार खास, यंदा कंपनी ४ ऐवजी ५ मॉडेल करु शकते लाँच, काय असेल iPhone 15 Ultra?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.