Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
GoPro Hero 12 Black ची किंमत
GoPro Hero 12 Black च्या स्टँडर्ड म्हणजे बेस व्हेरिएंटची भारतात किंमत ४५,००० रुपये आहे. तर क्रिएटर्स एडिशनसाठी ६५,००० रुपये मोजावे लागतील. क्रिएटर्स एडिसनमध्ये मीडिया मॉड, लाइट मॉड आणि वोल्टा ग्रिप असे फीचर्स मिळतात. हा कॅमेरा एकमेव ब्लॅक कलरमध्ये आला आहे. सध्या हा अॅक्शन कॅमेरा भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. ह्याची विक्री १३ सप्टेंबरपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलच्या माध्यमातून सुरु होईल. तर Max Lens Mod 2.0 नोव्हेंबरच्या अखेरीस सेलसाठी उपलब्ध होईल.
वाचा: Smartwatch ची बॅटरी लवकर संपतेय? आत्ताच करा हे उपाय, झटकन वाढेल बॅकअप
GoPro Hero 12 Black मधील नवीन फीचर्स
गोप्रोचा हा नवीन अॅक्शन कॅमेऱ्याची डिजाईन जास्त बदलली नाही परंतु हार्डवेयरमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या अॅक्शन कॅमेऱ्यात HDR (हाय डायनॅमिक रेश्यो) व्हिडीओचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा कॅमेऱ्याने 4K आणि 5.3K रिजोल्यूशनचे व्हिडीओ कॅप्चर करता येतील. तसेच यात व्हर्च्युअल कॅप्चर मोड फीचर देण्यात आलं आहे, जे ९:१६ आस्पेक्ट रेश्योमध्ये फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतं. त्याचबरोबर Time Wrap, Time Lapse, नाइट इफेक्ट्स आणि नाइट लॅप्स सारखे फीचर्स मिळतात.
नव्या GoPro Hero 12 Black मध्ये HyperSmooth ६.० आणि ऑटोबूस्ट फीचर देखील देण्यात आलं आहे त्यामुळे आधीच्या जेनरेशनच्या तुलनेत चार पट जास्त स्टॅबिलायजेशन मिळतं. तसेच यात SP Log + LUTS फीचर देखील देण्यात आलं आहे. नवीन इंटरवल फोटो फीचरच्या मदतीनं ०.५ सेकंद ते १२० सेकंदाच्या अंतराने फोटो आपोआप कॅप्चर करता येतात. तसेच वायरलेस ऑडियो रेकॉर्डिंगचा सपोर्ट देखील मिळतो, म्हणजे युजर्स आपल्या ब्लूटूथ ऑडियो डिवाइसेज कॅमेऱ्याला जोडून ऑडियो रेकॉर्डिंग करू शकतात. ह्या कॅमेऱ्यात एकत्र ४ ब्लूटूथ डिवाइसेज कनेक्ट करता येतात.
कंपनीनं कॅमेऱ्यात GP2 सेन्सरचा वापर केला आहे, जो एक १/१.९ इंचाचा सेन्सर आहे आणि ८:७ आस्पेक्ट रेश्योला सपोर्ट करतो. कॅप्चर केलेल्या फोटो आणि व्हिडीओचा प्रीव्यू पाहण्यासाठी ह्यात २.२७ इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा कॅमेरा १० मीटर म्हणजे ३३ फूट पाण्यात देखील फोटो आणि व्हिडीओ कॅप्चर करू शकतो. हा १०मीटर वॉटरप्रूफ रेटिंगसह येतो.
वाचा: Happy Krishna Janmashtami 2023: जन्माष्टमीचे व्हॉट्सअॅप स्टिकर्स कसे डाउनलोड आणि शेयर करायचे, जाणून घ्या
कॅमेऱ्याच्या खालच्या बाजूला यूनिवर्सल ट्रायपॉड थ्रेड माउंट देण्यात आला आहे. कंपनीनं ह्यात १,७२० एमएएचची बॅटरी दिली आहे जी जुन्या मॉडेलच्या तुलनेत दुप्पट बॅकअप देते. तसेच ह्यात Max Lens Mod 2.0 चा सपोर्ट मिळतो, जो १७७ डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 4K 60fps व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.