Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ सोहळ्याचे मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजन; ९ सप्टेंबरला पार पडणार कार्यक्रम
(वाचा : Caste Validity Certificate साठी आता No More Waiting; विद्यार्थी हिताचा विचार करत केवळ ८ दिवसात मिळणार दाखला)
सदर कार्यक्रमात मा. राज्यपाल यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांनी संपादीत केलेल्या ‘चिंतनातील क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि डॉ. संभाजी बिरांजे संपादित ‘करवीर संस्थान, बॅरिस्टर आंबेडकर आणि कोर्ट कचेरीतील बहिष्कृत’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळाही पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रानंतर दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून नामांकित वक्ते या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
‘रोल ऑफ लीगल एज्युकेशन इन सेटींग पाथ फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन बाय डॉ. आंबेडकर’ यावर डॉ. सिद्धार्थ घाटविसवे मार्गदर्शन करणार आहेत. ‘कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉ. आंबेडकर इन ड्राफ्टिंग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियन डेमॉक्रसी’ या विषयावर महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ मार्गदर्शन करणार आहेत.
‘रायटिंग ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यावर अॅड. उदय वारूंजीकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर- अ रोल मॉडेल (इंडिया अँड वर्ल्ड)’ यावर डॉ. प्रदीप आगलावे हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऐतिहासिक शताब्दी सोहळ्याला कायद्याचे अभ्यासक, तज्ज्ञ, वकिल आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
(वाचा : DSP Career Details: पोलीस उपअधीक्षक बनून देशसेवा करायची आहे? जाणून घ्या या पदासाठी आवश्यक पात्रता आणि जबाबदाऱ्या)