Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विमानात Airplane Mode ऑन करणे का गरजेचं आहे? कारण वाचून थक्क व्हाल

9

जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. विमानात बसण्यापूर्वी तुम्हाला तुमचे सर्व इलेक्ट्रॉनिक डिवाइसेज बंद करायचे असतात किंवा ते एयरप्लेन मोड टाकावे लागतात. परंतु बऱ्याचदा लोक असं करत नाहीत आणि विमान उड्डाणाला काही सेकंद असताना देखील फोनवर बोलत असतात.

केबिन क्रू नेहमीच प्रवाश्यांना त्यांचा फोन बंद करण्यास किंवा एयरप्लेन मोडवर टाकण्याच्या सूचना देत असतात परंतु अनेकजण आपली मनमानी करतात. अलीकडेच एक घटना समोर आली आहे ज्यात एक व्यक्तीनं केबिन क्रूच्या सूचना पाळण्यास नकार दिला. जेव्हा विमान उडण्यासाठी सज्ज झालं तेव्हा देखील तो फोनवर बोलत राहिला. त्या व्यक्तीला विमानातून उतरण्यास सांगितलं.

वाचा: १२ जीबी रॅम, १२० वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या फोनवर मोठा डिस्काउंट; iQOO Neo 7 5G ची किंमत झाली कमी

एका रिपोर्टनुसार, ४५ वर्षीय सुरनजीत दास चौधरी अलायंस एयरनं कोलकात्याला जात होता. जेव्हा विमान उडण्यासाठी सज्ज होता तेव्हा देखील तो फोनवर बोलत होता. जेव्हा त्याने केबिन क्रूच्या सूचना पाळण्यास नकार दिला तेव्हा सुरक्षा प्रोटोकॉलचं उल्लंघन झालं. चौधरीसह इतर १० लोकांनी देखील त्याच्याविना प्रवास करण्यास नकार दिला.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही घटना जेव्हा घडली तेव्हा विमान आकाशात झेपावलं होतं परंतु तरी देखील वैमानिकांनी विमान लँड केलं आणि त्या प्रवाशांना उतरवलं. त्यानंतर ह्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. परंतु त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणि त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

वाचा: UPI ATM: डेबिट आणि क्रेडिट कार्डविना काढता येतील पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

विमानात फ्लाइट मोड ऑन का करावं?

इलेक्ट्रॉनिक डिवाइसेसमधून जो सिग्नल निघतो तो विमानाच्या कम्यूनिकेशन प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करू शकतो. ज्या इलेक्ट्रॉनिक डिवाइसेसमध्ये सेल्यूलर कनेक्शन आहेत ते रेडियो वेव्हससह इलेक्ट्रॉमॅग्नेटिक इंटरफियरेंस निर्माण करतात. त्यामुळे फ्लाइटच्या सिग्नलमध्ये समस्या येते आणि वैमानिकांना ग्राउंड सपोर्ट स्टाफ किंवा एयर ट्रॅफिक कंट्रोलशी कनेक्ट करण्यात अडचण येऊ शकते. म्हणून विमानात डिवाइसेस बंद केले पाहिजेत किंवा फ्लाइट मोड ऑन केला पाहिजे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.