Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खुशखबर! सहा महिन्यात प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याचे पुणे विद्यापीठाचे आदेश..

7

Professors Recruitment Pune 2023: गेली काही वर्ष अनेक विद्यापीठांमध्ये प्राध्यापक पदांसाठीची भरती रखडलेली आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकच नाहीत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्राध्यापक संख्या अपुरी आहे तर काही महाविद्यालयांनी यावर तोडगा म्हणून कंत्राटी किंवा तासिका स्वरुपात प्राध्यपकांना रुजू केले आहे. परंतु नियमाप्रमाणे महाविद्याल्यामध्ये पूर्ण वेळ प्राध्यापक असणे गरजेचे आहे. त्यात आता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले जात आहे, त्यामुळे पुणे विद्यापीठाने आता प्राध्यापक भरतीबाबत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यातील महाविद्यालयांनी सहा महिन्याच्या आत प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याचा आदेश पुणे विद्यापीठाने (Pune University) दिला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आता प्राध्यापकांसाठी लवकरच महाभरती असणार आहे. प्राध्यापक पदाच्या नोकरीच्या प्रतीक्षेत असणार्‍यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

सध्या देशासह राज्यामध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Education Policy 2020) अंमलबजावणीचे काम वेगात सुरू आहे. यातील मार्गदर्शक तत्वांचे पालक करून हे धोरण महाविद्यालयांमध्ये राबवले जात आहे. त्यामुळे यासाठी महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा आदेश काढला आहे.

(वाचा: सातारा जिल्ह्यातील ६०० हून अधिक शाळा बंद करण्यासाठी सरकारच्या हालचाली! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान..)

राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.याबाबत पुणे विद्यापीठानेही आता सजग भूमिका घेतली आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय व मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थांनी संचालक, प्राचार्य व इतर शिक्षकीय पदे सहा महिन्यांच्या आत भरावी असा निर्देश पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांना दिले आहेत.

भारताचा सर्वांगीण शैक्षणिक विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांना मनासारखे शिक्षण घेता यावे यासाठी जुन्या प्रणालीतील अनेक गोष्टी वगळून नवे प्रगतिशील शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी, पुढीलकरिअरच्या दृष्टीने नवे मार्ग, संधी याचा विचार करून हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले गेले. २०२० साली तयार झालेल्या या धोरणाची आता अंमलबजावणी देशभरात सुरु आहे. राज्यातही यासाठी विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे विद्यापीठांना याची तयारी करणे अनिवार्य आहे. म्हणूनच पुणे विद्यापीठही आता कंबर कसून कामाला लागले आहे.

शिक्षणतज्ज्ञांची नाराजी

पुणे विद्यापीठाशी संलग्न असणारा महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमध्ये तब्बल २०० हुन अधिक कायमस्वरूपी प्राध्यापकांची पदे रिक्त असून आजवर ती भरण्यात आलेली नाही. आता असे आदेश काढून केवळ कागदी घोडा नाचवला जात असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील महाविद्यालयांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त असून, त्याचे गंभीर परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत आहेत. असे असताना केवळ नवे शिक्षण धोरण राबवण्यासाठी प्राध्यपकांची भरती करणे हे हास्यस्पद असल्याची नाराजी तज्ज्ञांची वक्त केली आहे.

(वाचा: BDL Recruitment 2023: भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.