Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पाहा तुमच्या बजेटमध्ये बसतोय का नोकियाचा आगामी 5G Phone; कंपनीनं टीज केली Nokia G42 5G ची किंमत

19

नोकिया भारतात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. कारण कंपनीनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की Nokia G42 5G लाँच केला जाईल. आता ह्या फोनची किंमत टीज करण्यात आली आहे. खरी किंमत मात्र लाँचच्या दिवशी म्हणजे ११ सप्टेंबरला समजेल.


Nokia G42 5G ची किंमत टीज

कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर Nokia G42 5G डिवाइसच्या किंमतीचा एक पोल सुरु केला आहे. कंपनीनं युजर्सना विचारलं आहे की हा डिवाइस १६xxx की १८xxx रुपयांमध्ये सादर होईल का? यावरुन अंदाज लावला जात आहे की डिवाइसचा बेस मॉडेल १६,००० रुपयांच्या रेंजमध्ये आणि टॉप मॉडेल १८,००० रुपयांच्या रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. याबाबत सुमारे ८१ टक्के युजर्सनुसार डिवाइस १६xxx रुपयांची रेंजमध्ये येईल. स्मार्टफोनच्या बेस मॉडेलमध्ये ४जीबी रॅम आणि टॉप मॉडेलमध्ये ६ जीबी रॅम मिळू शकतो. तसेच ५ जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह एकूण ११ जीबी रॅमचा सपोर्ट मिळेल.

वाचा: लीक झाला का तुमचा UPI PIN? भीम युपीआयच्या मदतीनं करा रिसेट, जाणून घ्या प्रोसेस

Nokia G42 5G चे स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉनवर Nokia G42 5G चे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स उपलब्ध आहेत. ह्यात ६.५६ इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो HD+ रिजॉल्यूशन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. Nokia G42 5G मध्ये पावरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४८० प्लस चिपसेट मिळेल. हा २.२ गीगाहर्ट्ज हाय क्लॉक स्पीडसह येईल.

डिवाइसमध्ये ६जीबी रॅमसह १२८जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. रॅम वाढवण्यासाठी ५जीबी पर्यंतचा व्हर्च्युअल रॅम सपोर्ट असेल.
ह्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात ५० मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि २ मेगापिक्सलचे अन्य मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर असतिल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

वाचा: OPPO A38 झाला भारतात लाँच; कमी किंमतीत ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५०००एमएएचची बॅटरी

Nokia G42 5G ला अधिकृतपणे दोन वर्ष अँड्रॉइड ओएस अपग्रेड आणि तीन वर्ष सुरक्षा अपडेट मिळतील. स्मार्टफोन ५००० एमएएचच्या बॅटरीसह २० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, OZO प्लेबॅक लाउडस्पिकर, ड्युअल सिम ५जी, वायफाय, ब्लूटूथ सारखे अनेक ऑप्शन मिळतील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.