Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असणाऱ्या Realme C51 ची विक्री आजपासून सुरु, Flipkart वर खास ऑफर्स

10

नवी दिल्ली : Realme C51 स्मार्टफोन काही काळापूर्वीच भारतीय बाजारात लाँच झाला होता. हा एक बजेट फोन सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला असून याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 4 GB रॅम, 2 TB पर्यंत एक्सपांडेबल मेमरी, 5000 mAh बॅटरी सारखे दमदार फीचर्स आहेत. एवढेच नाही तर या फोनमध्ये कमी बजेटमध्ये इतरही अनेक चांगले फीचर्स आहेत. तर या फोनचा पहिला सेल आज दुपारी १२ वाजल्यापासून आयोजित केला गेला असून Realme C51 ची किंमत आणि ऑफर्स जाणून घेऊया…

Realme C51 ची किंमत आणि ऑफर
या फोनच्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. हा फोन दोन हजार रुपयांच्या सवलतीसह ८,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. जर तुम्ही हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केला तर तुम्हाला दरमहा ३,००० रुपये द्यावे लागतील. बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवर ५ टक्के कॅशबॅक दिली जाईल. तसंच HDFC आणि SBI बँक कार्ड वापरल्यास ५०० रुपयांची सूट दिली जाईल. realme C51 कार्बन ब्लॅक आणि मिंट ग्रीन कलरमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

Realme C51 चे फीचर्स
या फोनमध्ये ६.७४ इंचाचा HD डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह सुसज्ज आहे. हा फोन Unisock T612 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ड्युअल रेअर कॅमेरा आहे ज्याचा पहिला सेन्सर ५० मेगापिक्सेल आहे. दुसरा ०.८ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन मिनी कॅप्सूल फीचरसह येतो. फोनमध्ये फास्ट साइड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

वाचा : डॅशिंग लूकसह अगदी Low Latency असणारे TWS Astra भारतात लाँच, किंमत फक्त १,३९९ रुपये

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.