Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 15 सीरिजमध्ये होऊ शकतात मोठे बदल; मोठी स्क्रीन, टायटेनियम फ्रेम आणि बरंच काही…

10

iPhone 15 Pro मॉडेल्समध्ये टायटेनियम फ्रेम

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मधील साइड एज मटेरियल बदलण्याची शक्यता आहे. कंपनी ह्या फ्रेमसाठी स्टेनलेस स्टीलच्या ऐवजी टायटेनियम फ्रेम वापरू शकते.

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये मोठी स्क्रीन

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये मोठी स्क्रीन

रिपोर्ट्सनुसार iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये थोडी मोठी स्क्रीन मिळेल. ही अतिरिक्त स्क्रीन बॉर्डर एक तृतीयांशनं कमी झाल्यामुळे मिळू शकते. पातळ बेझल मिळवण्यासाठी कंपनीनं एलआयपीओ ह्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा वापर केला आहे, असं सांगण्यात आला आहे.

वाचा: 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी असणाऱ्या Realme C51 ची विक्री आजपासून सुरु, Flipkart वर खास ऑफर्स

iPhone 15 Pro मॉडेलमध्ये फिजिकल ‘अ‍ॅक्शन बटन’

iPhone 15 Pro मॉडेलमध्ये फिजिकल ‘अ‍ॅक्शन बटन’

iPhone 15 Pro मध्ये अ‍ॅक्शन बटन मिळण्याची शक्यता आहे. हे बटन अ‍ॅप्पल वॉचमधील अ‍ॅक्शन बटन सारखं असेल, परंतु फोनसाठी. फिजिकल अ‍ॅक्शन बटन रिंग/सायलंट बटनची जागा घेईल आणि डिवाइस अनलॉक न करता विविध फंक्शन आणि सेटिंग अ‍ॅक्सेस करण्यास युजर्सना मदत करेल.

Apple iPhone 15 Pro मध्ये ब्रश्ड लूक असेलली फ्रेम

Apple iPhone 15 Pro मध्ये ब्रश्ड लूक असेलली फ्रेम

प्रो आयफोनमधील टायटेनियम एजमध्ये ब्रश्ड लूक मिळण्याची शक्यता आहे. हा आयफोन एक्स लाइनअप पासून वापरण्यात आलेल्या स्टीलची जागा घेईल.

वाचा: स्वदेशी कंपनीची कमाल! १६जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसह Lava Blaze 2 Pro लाँच

iPhone 14 लाइनअपपेक्षा वेगळा किनार

iPhone 14 लाइनअपपेक्षा वेगळा किनार

रिपोर्ट्सनुसार आगामी आयफोनमध्ये जुन्या मॉडेल्सप्रमाणे फ्रॉस्टेड ग्लास बॅक मिळेल. परंतु फ्रंट पॅनल आणि साइडला जोडणाऱ्या कडेची तीक्ष्णता कमी होईल.

​नवीन आयफोन असू शकतात हलके

<strong>​</strong>नवीन आयफोन असू शकतात हलके

नव्या डिवाइसची माहिती असणाऱ्या लोकांच्या मते टायटेनियमच्या वापरामुळे फोन जास्त टिकाऊ आणि १० टक्के हलके होतील.

वाचा: अजून एक स्वस्त 5G Phone घेऊन येतेय Samsung; Galaxy A25 5G गीकबेंचवर लिस्ट

iPhone 15 Pro मॉडेल्स रिपेयर करणे सोपं होईल

iPhone 15 Pro मॉडेल्स रिपेयर करणे सोपं होईल

iFixit च्या रिपोर्ट्सनुसार iPhone 15 Pro मॉडेल्स आतून नव्या चॅसीसशी जुळवून घेण्यासाठी रीडजाईन करण्यात आले आहेत. त्यामुळे हे मॉडेल्स रिपेयर करण्यास थोडे सोपे होऊ शकतात.

वाचा: आता छोटी कंपनी भिडणार सॅमसंगशी; Tecno Phantom V Flip ची लाँच डेट आली समोर

चारही iPhone 15 मॉडेलमध्ये यूएसबी-सी सपोर्ट

चारही iPhone 15 मॉडेलमध्ये यूएसबी-सी सपोर्ट

iPhone 15 सीरिजच्या चारही मॉडेल्समध्ये लायटनिंगच्या ऐवजी यूएसबी-सी वायर्ड चार्जिंग आणि डेटा ट्रांसफरचा सपोर्ट मिळू शकतो. परंतु रिपोर्ट्सनुसार वाढलेला डेटा ट्रांसफर स्पीड फक्त प्रो मॉडेलपुरता मर्यादित ठेवला जाऊ शकतो. सर्व फोन्समध्ये फास्ट वायरलेस चार्जिंग मिळू शकते.

iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये डायनॅमिक आयलंड

iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये डायनॅमिक आयलंड

iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये डायनॅमिक आयलंडचा मोठा डिजाईन चेंज दिसेल, जो गेल्यावर्षी फक्त iPhone 14 Pro मॉडेल्समध्ये मिळाला होता. कॅप्सूलच्या आकाराचा डायनॅमिक आयलंड डिस्प्लेवर काही अलर्टस पाहण्यास मदत करतो.

iPhone 15 मध्ये नवीन कलर्स

iPhone 15 मध्ये नवीन कलर्स

अ‍ॅप्पल आगामी आयफोनसाठी काही नवीन रंग सादर करू शकते. iPhone 15 आणि iPhone 15 Plus चे पिंक, ब्लॅक, व्हाइट, ब्लू आणि येलो कलर्स येऊ शकतात. तर iPhone 15 Pro मॉडेल्समध्ये ग्रे, ब्लॅक, डार्क ब्लू आणि व्हाइट कलरचा पर्याय मिळू शकतो. कंपनी लेदर केस बंद करून आणखी पर्यावरणपूरक मटेरियलचा वापर करू शकते.

वाचा: …म्हणून चीनने घातली iPhone वर बंदी; अ‍ॅप्पलच्या अडचणीत वाढ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.