Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सीबीएसई बोर्डाच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल; दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा कसा असेल पेपर अन् काय असेल मार्किंग स्कीम?
पेपर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना cbseacademic.nic.in या वेबसाईटवर जावे लागेल.
(वाचा : CBSE: सीबीएसई बोर्डाने जाहीर केले दहावी-बारावी २०२४ परीक्षेचे वेळापत्रक, जाणून घ्या केव्हा असणार अंतिम परीक्षा)
CBSE बोर्डाच्या परीक्षेत हे मोठे बदल :
- सीबीएसई बोर्डाची परीक्षा आता अधिक विश्लेषणात्मक (Analytical), संकल्पनेवर आधारित (Concept based questions) प्रश्नांवर आधारित असेल.
- विविध MCQ, लहान उत्तरे आणि थोडक्यात उत्तरे अशा प्रश्नांचा समावेश असेल.
- जवळपास ५० टक्के प्रश्नांचे MCQ मध्ये रूपांतर करण्यात आले असून, त्यांना एक ते दोन गुण आहेत.
असे डाउनलोड करा :
- नवीन नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईटवर cbseacademic.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
- येथे मुख्यपृष्ठावर, Question Bank वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवी असणारी इयत्ता आणि विषय निवडून ते SQP (Sample Question Paper) आणि MS (Marking Scheme) डाऊनलोड करा.
बोर्डाच्या पूर्व परीक्षा काही महिन्यांत सुरू होणार आहेत. त्यामुळे परीक्षेपूर्वी तयारीसाठी ही नामी संधि असणार आहे. शिवाय, परीक्षेचा नवा पॅटर्न समजून घेऊन त्यादृष्टीने अभ्यासाचे प्लॅनिंग करणेही विद्यार्थ्यंनासाठी सोयीचे ठरणार आहे.
(वाचा : CBSE Exam 2024: सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेसाठी सोडलेला नमुना पेपर,असे डाऊनलोड करा सँपल पेपर)