Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

डीआरडीओमध्ये Scientist B पदासाठी भारती; २९ सप्टेंबरपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज

15

DRDO Recruitment 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) वैज्ञानिक बी (Scientist B) पदाच्या २०४ जागांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र, आता या अर्ज नोंदणीला मुदतवाढ देणात आली असून, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Defence Research and Development Organisation – DRDO, Ministry of Defence, Government of India.च्या अधिकृत वेबसाइटवर याबद्दलची अधिकृत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून, जागांवर अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार डीएसटी, एडीए आणि सीएमई विभागांमध्ये संस्थेमार्फत सदर भरती प्रक्रिया केली जाणार आहे. या भरतीमधून निवडलेल्या उमेदवारांना तब्बल ५६ हहजार १०० रुपये ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये एवढा पगार प्रति महिना देण्यात येणार आहे. या संबंधित अधिक माहिती संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला तपासू शकता.

(वाचा : महाराष्ट्र शासन, आरोग्य विभागाच्या ‘गट-क’ संवर्गात ६ हजारांहून अधिक जागांसाठी पदभरती; १८ सप्टेंबर अर्जाची शेवटची तारीख)

पदभरतीचा तपशील :

डीआरडीओच्या या भरतीअंतर्गत एकूण २०४ पदांवर भरती करण्यात येणार आहे. त्यापैकी,
१८१ जागा DRDO मध्ये Scientist B पदांसाठी आहेत
११ जागा DST मध्ये Scientist B पदांसाठी आहेत.
तर, ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता बी (Scientist/Engineer B) पदासाठी ६ जागा आहेत.

भरतीशी संबंधित अधिक माहिती अधिसूचनेत तपासली जाऊ शकते.

निवड प्रक्रिया :

DRDO मधील या जागांसाठी मुलाखतीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीत संबंधित विषयांवरून प्रश्न विचारले जातील.

वयोमार्यादा :

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमधील SCIENTIST B पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. याव्यतिरिक्त, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. ही सूट केंद्र सरकारच्या नियमांनुसार देण्यात आली आहे.

(वाचा : NHAI Recruitment 2023: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ जागांवर भरती)

शैक्षणिक पात्रता :

सदर जागांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारकडे

  • Graduate Aptitude Test in Engineering (GATE) स्कोअर असणे अनिवार्य आहे.
  • शिवाय, संबंधित विषयात इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला ही सर्व माहितीही अर्जात द्यावी लागणार आहे.

DRDO भरतीसाठी असा करा अर्ज :

  1. सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
  3. वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  4. DRDO भर्ती 2023 फॉर्म भरा आणि सबमिट करा.
  5. यानंतर, फॉर्म फी भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
  6. फॉर्म सबमिट करा.
  7. यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ रिक्त पदांसाठी भरती; थेट मुलाखातीमधून होणार निवड)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.