Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जवानने पार केला ६०० कोटींचा पल्ला, पण तरीही सनी देओलचा गदर २ करतोय किंग खानवर मात

13

मुंबई– शाहरुख खानचा ‘जवान’ हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे ज्याने ६ दिवसात ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात लोक हा चित्रपट एखाद्या उत्सवासारखा साजरा करत आहेत. बॉक्स ऑफिसवरही सिनेमातं हँगओव्हर दिसून येत आहे. मात्र, या सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाची कमाई आता झपाट्याने घसरत आहे. मंगळवारी ‘जवान’ने देशात आणि जगभरात किती कमाई केली ते जाणून घेऊया.

बॉक्स ऑफिस कलेक्शनवर काम करणार्‍या sacnilk च्या वृत्तानुसार, अॅटली दिग्दर्शित या चित्रपटाने रविवारी धमाका केला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापेक्षा जास्त कमाई केली होती. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती, तर रविवारी बॉक्स ऑफिसवर ८०.१ कोटींची कमाई करून त्सुनामी आणली. मात्र सोमवारी अचानक निम्म्याहून कमी कमाई झाली आणि ३२.९२ कोटी रुपये जमा झाले. तर मंगळवारी सहाव्या दिवशी ‘जवान’ फक्त २६.५० कोटी रुपये कमवू शकला. या दिवसात चित्रपटाने एकूण ३४५.५८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

जिच्या मुलाचं निधन झालं, त्याच्या अस्थी…पवित्र रिश्तामधील तो सीन करण्यास उषा नाडकर्णींचा होता नकार
‘गदर २’ चित्रपटाच्या तुलनेत ‘जवान’ खूपच मागे आहे.

आता सनी देओलच्या ‘गदर २’ या चित्रपटाची तुलना करायची झाल्यास यावर्षी त्याने बंपर कमाई केली आहे, तर ‘जवान’ खूपच मागे राहिला आहे. खरं तर, शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ने मंगळवारी ५५.४ कोटींची कमाई केली होती. तर ‘जवान’ने मंगळवारी केवळ २६.५० कोटी रुपयांची कमाई केली जी २८.९ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. हे आकडे नक्कीच आश्चर्यकारक आहेत. दुसरीकडे, ‘जवान’च्या पहिल्या मंगळवारच्या कमाईची तुलना ‘पठाण’शी केली, तर ‘जवान’ने चांगली कामगिरी केली आहे. ‘पठाण’ने मंगळवारी २३ कोटींची कमाई केली होती.

चित्रपटगृहाबाहेर ढोल ताशांचा गजर, ‘जवान’च्या शो पूर्वी चाहत्यांचा जल्लोष

‘जवान’ने ६ दिवसात ६०० कोटींचा टप्पा पार केला

‘जवान’ची जगभरातील कमाई पाहिली तर ती जबरदस्त आहेत. या चित्रपटाने ६ दिवसात ६०० कोटींचा टप्पा पार केला आहे. पाचव्या दिवशी जगभरात ५७५.८० कोटी रुपये कमावले असताना आता सहाव्या दिवशी ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. याने ५ दिवसात भारतात ३८३.८० कोटी रुपयांची कमाई केली, तर परदेशात १९२.०० कोटी रुपये जमा केले आहेत.

पंडितांच्या घरी जन्माला आला…नंतर पत्रिका पाहून बसला धक्का, विकी कौशलच्या सिनेमाच भन्नाट ट्रेलर
‘जवान’ने दुप्पट किंमत कमावली

शाहरुख आणि नयनतारा यांचा ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. ३०० कोटी रुपये खर्चून बनलेला हा मोठा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा ३ वेगवेगळ्या भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांनी त्यांचा चित्रपट जवळपास ५००० स्क्रीन्सवर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत दुप्पट कमाई केली आहे.

दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंतच्या कलाकारांनी ‘जवान’मध्ये टाकला प्राण

या चित्रपटाचे सौंदर्य म्हणजे यात प्रत्येक छोट्या कलाकाराला दमदार भूमिका देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अभिनेते एकमेकांना साजेसे दिसले आहेत. शाहरुख खान या चित्रपटात दुहेरी भूमिकेत आहे आणि त्याच्याशिवाय नयनतारा, विजय सेतुपती यांसारख्या दक्षिणेकडील दिग्गजांसह सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सुनील ग्रोव्हर यांसारख्या बॉलिवूड स्टार्सनी आकर्षण वाढवले आहे. संपूर्ण इंडस्ट्रीतील लोक हा चित्रपट पाहून सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.