Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Itel ने लाँच केला iPhone सारखा लुक असणारा स्मार्टफोन, Itel S23 Plus काय आहे खास?

10

नवी दिल्ली : itel S23 Plus Launch : आयटेल कंपनीने इथियोपियामध्ये आपला नवीन S23 मालिकेील स्मार्टफोन लाँच केला आहे. itel S23 Plus हा कंपनीचा नवीन फोन असून itel S23 चा प्लस प्रकार आहे. itel S23 जूनमध्ये लाँच झाला होता. त्यानंतर आता लेटेस्ट itel S23 Plus बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन कर्व्ह AMOLED स्क्रीनसह येतो. या फोनमध्ये 50MP प्राइमरी रेअर कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा आणि ६.७८ इंच स्क्रिनसारखे फीचर्स आहेत. चलातर याच्या किंमतीसह फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ…

itel S23 Plus चे फीचर्स
Itel S23+ स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच फुलएचडी+ AMOLED कर्व्ह डिस्प्ले आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९३ टक्के आहे आणि संरक्षणासाठी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 900 nits आहे. डिव्हाईसच्या बॅक पॅनलबद्दल बोलायचे झाले तर याला आयफोनसारखा लुक देण्यात आला आहे. Itel च्या या फोनमध्ये बॅक पॅनलवर iPhone 14 Pro सारखा कॅमेरा कटआउट आहे. पण या कटआउटमध्ये फक्त दोन कॅमेरा सेन्सर आहेत. itel S23 Plus स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेल प्राइमरी आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. itel S23+ मध्ये Unisoc T616 (12nm) प्रोसेसर आहे. फोनमध्ये 8 GB रॅम आणि 256 GB इनबिल्ट स्टोरेज आहे. हँडसेटमधील रॅम अक्षरशः 8GB पर्यंत वाढवता येते. म्हणजेच फोनला 16GB पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल. डिव्हाइसमध्ये Android 13 आधारित itelOS V13.0.0 इन्स्टॉल्ड आहे.

या Itel फोनला पॉवर करण्यासाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W चार्जिंगला सपोर्ट करते. Itel म्हणते की S23+ फक्त २ तासात पूर्णपणे चार्ज होतो. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Itel S23 Plus मध्ये Bluetooth 5.0, GPS, 4G LTE, NFC आणि Wi-Fi 5 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने अद्याप itel S23+ ची किंमत जाहीर केलेली नाही. याबाबतची अधिकृत माहिती लवकरच दिली जाईल, अशी अपेक्षा आहे.
वाचा : iPhone 15 मध्ये नवीन काय? ‘हे’ आहेत ५ महत्त्वाचे अपडेट्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.