Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Honor 90 5G ची किंमत
हा स्मार्टफोन अॅमरल्ड ग्रीन, डायमंड स्लिव्हर आणि मिडनाइट ब्लॅक रंगात विकत घेता येईल. Honor 90 5G च्या ८जीबी रॅम व २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २७९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम ५१२ जीबी व्हेरिएंटची प्रारंभिक किंमत २९९९९ रुपये आहे. Honor 90 5G ची विक्री १८ सप्टेंबरपासून अॅमेजॉन आणि रिलायन्स स्टोरवर केली जाईल.
वाचा: नवीन Power Bank विकत घेताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर…
Honor 90 चे स्पेसिफिकेशन्स
Honor 90 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलायजेशनसह २०० मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरा मिळतो. जोडीला १२मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर फ्रंटला कंपनीनं ५० मेगापिक्सलचा सेल्फी शुटर दिला आहे.
फोनमध्ये ६.७ इंचाचा कर्व एज अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १.५के रेजोल्यूशनला सपोर्ट करतो, त्याचबरोबर १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १६०० निट्झ पीक ब्राइटनेस, ४३५पिक्सल डेन्सिटी, एचडीआर १०+ सपोर्ट आणि ३८४०हर्ट्झ पीडब्लूएम डिमिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
कंपनीनं Honor 90 5G मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेटचा वापर केला आहे. त्याचबरोबर ८जीबी रॅम आणि २५६जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित मॅजिकओएस ७.१ वर चालेल.
वाचा: कमी किंमतीत महागडे फीचर्स देण्यासाठी शाओमी सज्ज; Redmi Note 13 सीरीजची लाँच डेट कंफर्म
पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ६६वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम ५जी, ४जी, ब्लूटूथ, डुअल बँड वाय-फाय, जीपीएस, एनएफसी, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.