Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Motorola Edge 40 Neo ची किंमत
मोटोरोला एज ४० नियो ग्लोबल मार्केटमध्ये १२जीबी रॅमसह लाँच झाला आहे सोबत २५६जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ह्या फोनची किंमत €३९९ यूरो पासून सुरु होते जी भारतीय करंसीनुसार ३५,५०० रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे की Motorola Edge 40 Neo २१ सप्टेंबरला भारतात ह्याच स्पेसिफिकेशन्ससह लाँच होईल.
वाचा: १२८जीबी मेमरी कमी पडते? मग २२ सप्टेंबरला येतोय २५६जीबी स्टोरेज असलेला नवा फोन, जाणून घ्या माहिती
Motorola Edge 40 Neo डिजाइन
एज ४० नियो आयपी६८ रेटिंगसह येणारा जगातील सर्वात पातळ ५जी फोन आहे असा दावा मोटोरोलानं केला आहे. हा स्मार्टफोन PANTONE Black Beauty, PANTONE Soothing Sea आणि PANTONE Caneel Bay कलरमध्ये आला आहे. ह्यात ब्लॅक मॉडेल के रियर पॅनलवर acrylic चा वापर केला गेला आहे तसेच अन्य दोन पॅनल vegan leather वाले आहेत. फोन IP68 रेटिंगमुळे हा बराच वेळ पाण्यात देखील सुरक्षित राहू शकतो.
Motorola Edge 40 Neo स्पेसिफिकेशन्स
मोटोरोला ऐज ४० नियो स्मार्टफोन १०८० x २४०० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५५ इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन पीओएलईडी पॅनलवर बनली आहे जी १४४हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच ३६०हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. ह्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.
नवीन मोटोरोला स्मार्टफोन अँड्रॉइड १३ ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी ७०३० ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी Edge 40 Neo मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी ६८वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. त्यामुळे १५ मिनिटांत बॅटरी ५०% पर्यंत चार्ज होऊ शकते.
वाचा: २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor 90 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत
फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो ओआयएस टेक्नॉलॉजीसह येतो. बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Motorola Edge 40 Neo स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे जो अॅडव्हान्स फिल्टर्ससह चालतो.