Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अरे वाह! वनप्लसच्या ५जी फोनवर ३ हजारांचा डिस्काउंट, इअरबड्सही मिळतील मोफत

11

OnePlus Nord 3 5G जुलै २०२३ मध्ये लाँच करण्यात आला होता. आता ह्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर सादर करण्यात आली आहे. अ‍ॅमेझॉनवरून OnePlus Nord 3 5G खरेदी केल्यास फक्त भरपूर डिस्काउंट मिळणार नाही तर ग्राहकांना Nord Buds 2R इअरबड्स मोफत खरेदी करता येतील. चला जाणून घ्या वनप्लसच्या ह्या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डीलची माहिती.

OnePlus Nord 3 5G वरील ऑफर

OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी केल्यास ग्राहकांना २,१९९ रुपयांचे Nord Buds 2R इअरबड्स मोफत मिळतील. हे बड्स चेकआऊटच्या वेळी ऑर्डरमध्ये अ‍ॅड होतील. ही ऑफर ८जीबी रॅम व १२८जीबी आणि १६ जीबी व २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर उपलब्ध आहे.

वाचा: आयफोन १५ ला टक्कर देणारा अँड्रॉइड फोन हवा? दणकट Xiaomi 14 Pro ची लाँच टाइमलाइन लीक

तसेच अ‍ॅमेझॉन कडून मिळणारा १,००० रुपयांचा कुपन डिस्काउंट आणि Axis, Citi किंवा OneCard क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास २,००० रुपयांची सूट मिळेल. अशाप्रकारे एकूण ३००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. फोनचा ८जीबी रॅम व्हेरिएंट ३३,९९९ रुपये आणि १६जीबी व्हेरिएंट ३७,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 3 5G मध्ये ६.७३ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे, जो २,४१२ x १,०८० पिक्सल रिजोल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ह्या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. ह्याचे डायमेन्शन उंची १६२.७ मिमी, रुंदी ७५.५ मिमी, जाडी ८.२ मिमी आणि वजन १८४ ग्राम आहे.

या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेंसीटी ९००० प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर १६ जीबी पर्यंत रॅम आणि २५६जीबी पर्यंतची स्टोरेज मिळते. हा फोन अँड्रॉइड १३ आधारित ऑक्सिजन ओएस १३.१ वर चालतो. तसेच ह्यात डॉल्बी अ‍ॅटमॉस स्टिरियो स्पीकर, एक्सेलेरोमीटर सेन्सर, जायरोस्कोप सेन्सर, प्रोक्सिमिटी सेन्सर आणि कंपास सेन्सर मिळतो.

वाचा: एकच नंबर! आला पाण्यात वापरता येणारा सर्वात पातळ फोन; Motorola Edge 40 Neo झाला लाँच

Nord 3 5G च्या मागे ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बॅटरी बॅकअपसाठी ह्यात ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.