Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
किंमत
Xiaomi Redmi Smart TV 4K कंपनीनं २४,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. शाओमी ह्या टीव्ही सोबत एक वर्षांच्या वॉरंटीसह एक वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी देत आहे. कंपनीनं अद्याप सेल डेटची घोषणा केली नाही. फेस्टिव सीजनमध्ये ह्या टीव्हीची विक्री सेल अॅमेझॉन आणि Mi.com वर सुरु होईल.
वाचा: अरे वाह! वनप्लसच्या ५जी फोनवर ३ हजारांचा डिस्काउंट, इअरबड्सही मिळतील मोफत
Redmi Smart Fire TV 4K चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Smart Fire TV 4K मध्ये ४३ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्या 4K डिस्प्लेचं पिक्सल रिजोल्यूशन ३८४० x २१६० आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्झ आहे. हा HDR सपोर्टसह येतो. स्मार्ट टीव्ही मेटल बेजल डिजाइनसह बाजारात आली आहे.
रेडमीच्या ह्या स्मार्ट टीव्हीमध्ये ६४-बिट क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे, जो २जीबी रॅम आणि ८जीबी स्टोरेजसह येतो. चांगल्या ऑडियो क्वॉलिटीसाठी ह्या स्मार्ट टीव्हीमध्ये Dolby Audio सह २४ वॉटचा ड्युअल स्टिरियो स्पिकर्स देण्यात आले आहेत. तसेच ह्यात चांगल्या ऑडियो क्वॉलिटीसाठी DTS Virtual:X आणि DTS:HD मिळतो.
Redmi Smart Fire TV 4K टीव्ही FireOS वर चालतो आणि सहा युजर प्रोफाईलचा सपोर्ट देतो. ह्यात १२,००० पेक्षा जास्त अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.इतकचं नव्हे तर टीव्ही बिल्ट-इन Alexa व्हॉइस असिस्टंट आणि पॅरेण्टल कंट्रोलसह येतो. ह्यात पिक्चर-इन-पिक्चर मोड देण्यात आला आहे.
वाचा: आयफोन १५ ला टक्कर देणारा अँड्रॉइड फोन हवा? दणकट Xiaomi 14 Pro ची लाँच टाइमलाइन लीक
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्ट टीव्हीमध्ये Miracast आणि AirPlay 2 मिळतो. ह्यात ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, तीन एचडीएमआय २.१ पोर्ट्स, दोन यूएसबी पोर्ट्स, एक ईथरनेट पोर्ट आणि एक हेडफोन जॅक मिळतो. टीव्हीसोबत प्राइम व्हिडीओ, अॅमेझॉन म्यूजिक आणि नेटफ्लिक्ससाठी एक मिनिमलिस्टिक रिमोट मिळतो.