Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

a case against a soldier: सैन्यदलात नोकरीला लावण्यासाठी सैनिकाने घेतले २९ लाख रुपये

16

म टा प्रतिनिधी, कोल्हापूर

मी सैन्य दलात आहे, मला दोन खून माफ आहेत, पैशासाठी तगादा लावला तर तुझाच खून करीन अशी धमकी देणार्‍या आणि सैन्यदलात नोकरी लावतो म्हणून २९ लाख रुपये घेतलेल्या एका सैनिकासह त्याच्या पत्नीवर कोल्हापुरात गुन्हा दाखल आहे. (a case has been registered in kolhapur against a soldier who threatened to end life)

याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक सविता पाटील आणि तिचा पती प्रवीण मरगजे या दोघांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आणि सैनिक या दोघा विरोधातही गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे.

क्लिक करा आणि वाचा- मोठा दिलासा; राज्यात करोना रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली, नवे रुग्णही घटले

कोल्हापुरातील कसबा बावडा येथे शैलेश खरात राहतात. त्यांची याच गावात राहणाऱ्या पोलीस नाईक सविता पाटील आणि तिचा पती प्रवीण मरगजे यांच्याशी ओळख आहे. सैन्यदलात भरती करण्यासाठी खरात यांच्याकडून या पती-पत्नीनी २९ लाख रुपये घेतले. पण प्रत्यक्षात नोकरी लागली नाही. यामुळे पैसे परत देण्यासाठी खरात यांनी त्यांच्याकडे विचारणा सुरू केली. काही रक्कम त्यांनी खरात यांना परत केली. पण, उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. शिवाय मला दोन खून माफ आहेत, पुन्हा पैसे मागितल्यास तुझा खून करू अशी धमकी यांनी दिली. तर पोलीस नाईक सविता पाटील हिने पैशाची मागणी केली तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.

क्लिक करा आणि वाचा- ‘अजित पवार यांच्या म्हणण्याला काडीची किंमत नाही’; पडळकरांचा हल्लाबोल

याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध शाहूपूरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- दहीहंडी उत्सवाला परवानगी मिळणार का?; भाजपने केली ‘ही’ मागणी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.